पान:विवेकानंद.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

बिंबाची छायाचित्रे घेत आहे. तो परत आल्यावर ती निरनिराळी छायाचित्रे आपण परस्परांशी ताडून पाहिली तर ती एकमेकांपासून किती तरी भिन्न दिसतील. पण असा भिन्नपणा प्रत्यक्ष दिसत असतांही त्यांतील अमुक खोटें असे आपल्याच्याने ह्मणवेल काय ? सर्व चित्रे एकमेकांपासून भिन्न असली तरी ती एकाच वस्तूची चित्रे असल्यामुळे सर्वच खरी आहेत. त्यांत दिसणारा बदल भिन्न देशकालपरिस्थितीमुळे झाला आहे. याच रीतीनें भिन्न परिस्थितीमुळे एकच सत्य भिन्न मार्गांनी प्रकट झाले आहे. हिंदूंनी याच सिद्धांताची ओळख पक्की करून घेतली असल्यामुळे सर्वच धर्म सत्य आहेत असे ते जाणतात. एखाद्या रानटी टोळीच्या धर्मापासून तो थेट अद्वैत सिद्धांतापर्यंतचे सारे धर्म खरेच आहेत असे हिंदूचे मत आहे. याचकारणामुळे केवळ भिन्नधर्मी ह्मणून एखाद्याचा छळ झाला अशी गोष्ट हिंदुस्थानांत कधीही घडून आली नाही. परधर्माबद्दल अत्यंत सहिष्णुताच नव्हे, तर पूज्यबुद्धि दाखविणारे एकटे हिंदू लोकच या पृथ्वीच्या पाठीवर आहेत हे लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. एका महंमदी फकिराच्या थडग्याकडे मुसलामन लोक सध्या ढुंकूनही पाहत नसतां हिंदु लोक त्याची पूजा अर्चा करतात! अशा प्रकारची अनेक उदाहरणे आजमितीस तुह्मांस हिंदुस्थानांत आढळून येतील.
ज्या एकाच्या शोधांत सारे जग गुंतलें आहे ते शोधून काढीपर्यंत स्वस्थ बसावयाचें नाहीं अशी प्रतिज्ञाच, जणु काय, हिंदूंनी केली होती. प्रत्येक वस्तूचे मूलरूप शोधून काढण्याचा यत्न आजची युरोपियन भौतिकशास्त्र करीत आहेत. ज्या परमाणूंतून अथवा अणूंतून एखाद्या पदार्थास आजचे दृश्य स्वरूप प्राप्त झाले आहे त्या परमाणूचा अथवा अणूचा शोध लागला ह्मणजे त्या शास्त्राचा पुढील मार्ग आपोआपच बंद होतो. त्याचप्रमाणे अनेकशः भासमान होणारे जीवात्मे एकाच परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहेत असा शोध लागला ह्मणजे आपल्या धर्मसंशोधनाचाही शेवट झालाच. हैं सिद्ध झालें ह्मणजे जगांत जें जें कांहीं दृश्यत्वास आले आहे ते ते त्या एकाचॅच स्वरूप आहे असे आपणांस आढळून येईल. अशा रीतीनें भौतिक शास्त्रांस ज्याचा शोध लागला नाही त्याचा शोध अध्यात्मविद्येने (metaphysics ) लाविला आहे. थोडासा विचार केला तर अध्यात्मसिद्धांतांच्या मदतीशिवाय भौतिक शास्त्रांस पुढे पाऊलच टाकता येत नाहीं असे आपणांस