पान:विवेकानंद.pdf/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सामाजिक परिषदेतील भाषणावर टीका.

२५७


इच्छाच ज्याला झाली नाहीं त्यापेक्षां समरांगणांतून वार खाऊन पळून आलेला योद्धाही अधिक शूर नव्हे काय ?
 आमच्या सामाजिक सुधारककंपूच्या अंतर्गत गुहांत प्रकाश पाडणारा एखादा दिवा जर पैदा झाला आणि त्या प्रकाशांत सुधारकांतील कर्तव्य- भ्रष्टांची यादी जर करतां आली, तर आपल्या कर्तव्यापासून घसरलेल्या सुधा- रकांची यादी संन्याशांच्या यादीपेक्षां निःसंशय मोठी होईल ! हा दिवा झटला म्हणजे आपलीच सदसद्विवेकबुद्धि ती पाजळून सधारकांनी हें टिपण तयार करून पाहावें.
 ‘अनेक प्रकारच्या अनुभवांची' चर्चा येथवर केली. आतां दुसन्या बाजूच्या अनुभवांचा ' विचारही अवश्य केला पाहिजे. केवळ स्वतःच्या हिंमतीवरच आयुष्य क्रमावयाचें, सर्वांच्या मदतीचा धिःकार करावयाचा, सर्व प्रकारच्या वादळांस एकट्यानें तोंड द्यावयाचें, कोणत्याही लौकिक फळाच्या अपेक्षेशिवाय सर्व कर्मे करावयाचीं, आणि कर्तव्य ह्मटले की त्यांत भलेबुरें ह्मणावयाचें नाहीं; या अनेक प्रकारच्या 'अनुभवांची ' वाट काय ? सर्व आयुष्यभर आनंदी आनंद ! सर्वच मोकळेपणा ! गुलामासारखें राबविणारी, खोट्या ममतेची आणि खोट्या मोठेपणाचीं सोंगें हवींत कोणाला ? तीं तुमचीं तुझांलाच लख- लाभ असोत. हा आयुष्यक्रम फक्त संन्याशालाच प्राप्त होणारा आहे. आतां धर्माचें कसे काय हाही एक विचाराचा प्रश्न आहे. धर्म हवा कीं नको ? त्यानें मरावें की जगावें ? जर त्याला जगावयाचें असेल तर त्याला त्याचे रक्षक शिपाई अवश्य हवेतच. हा रक्षक शिपाई ब्रह्मचारी हाच. त्याच्या साऱ्या आयु- घ्यक्रमाचा हेतु एकच-धर्म. तो परमेश्वराचा पट्टेवाला. जोपर्यंत एखाद्या धर्माला असले रक्षक असतील तोपर्यंत तो धर्म सलामत राहणारच.
 क्याथोलिक पंथी ब्रह्मचाऱ्यांच्या हल्यापुढे प्रॉटेस्टंट अमेरिका आणि इंग्लंड यांची हाडें कां खिळखिळी होऊं लागली आहेत याचा विचार करा. रानड्यांच्या नांवाचा डंका ! सर्व सुधारकांच्या नांवांचा डंका !! - अरेरे हिंदुस्थाना, आंग्लीभूत ( Anglicised ) हिंदुस्थाना, बाळा, एक गोष्ट मात्र विसरूं नको हो ! या हिंदु मानवकुलांत एक एक कोडें असें आहे की त्याचा स्पर्शही तुला अथवा तुझ्या पाश्चात्य गुरूंना झालेला नाहीं. मग तें सोडविण्याचा वायदासुद्धां नको !!
 स्वा. वि. खं. ३-१७