पान:विवेकानंद.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


 आमच्या सुधारकमंडळींनी दुसरेही एक कारण पुढे केले आहे. “परमेश्वराने आह्मांस अनेक प्रकारच्या वासना आणि शक्ती दिल्या आहेत, त्या उपयोगाकरितां आहेत. याकरितां संन्याशाने प्रजावृद्धि न करणे हे पातक आहे.” खाशी ! आपणांला परमेश्वराने चोरीची, जारपणाची, दुष्टत्वाची, लुटारूपणाची, फसवेगिरीची आशा अनेक वासना दिल्या आहेत. समाजाचे रूप कायम राहावयाचे असेल तर त्याकरितां या सर्वांचीच अत्यंत आवश्यकता आहे. मग तो समाज सुधारलेला असो अगर रानटी असो. यांची वाट कशी लावावयाची ? यांचा प्रसारही खूप जोरसे ' करावयाचा की काय ? अनेक प्रकारचे अनुभव माणसाला हवेत ह्मणतां तर त्यांत हेही अवश्य पाहिजेत. आमच्या सामाजिक सुधारकांची परमेश्वराशीं अगदी पक्की गट्टी-लंगोटी मैत्री –झाली आहेसे दिसते. त्यांना जसे त्याचे सर्व हेतू कळतात तसे ते दुस-या कोणास कळल्याचे ऐकिवांत नाही. त्या अर्थी या प्रश्नालाही उत्तर त्यांनच दिले पाहिजे; आणि ते उत्तर 'होय' हेच येणार. विश्वामित्र, आत्रे आणि इतर ऋषी यांचे अनुकरण करून व्याघ्ररूपी वनावयाचे, की वशिष्ठाचे अनुकरण करून स्त्रियांबद्दलचा ‘सर्व प्रकारचा अनुभव घेऊन शेंकडों पोरें जन्मास घालावयाचीं ? गृहस्थाश्रमी अनेक ऋषिवर्याची मोठी कर्तबगारी जी काय दिसली ती शक्य त्या रीतीने उदारपणे पोरें “जन्मविण्यांत' आणि आकंठ सोमपान करण्यांत मात्र दिसली. आह्मींही याचेच अनुकरण करावयाचें की धर्मप्राप्तिकरितां ब्रह्मचर्य अत्यावश्यक आहे किंबहुना धर्माचा तो पायाच आहे.-असा दुंदुभि ज्यांनी वाजविला त्यांच्यामागे जावयाचे हा मोठा प्रश्न आह्मांपुढे आहे.
 आतां सुधारकांच्या हत्याराला बळी पडणारा आणखीही एक वर्ग आहे. तो वर्ग म्हणजे खोट्या ब्रह्मचा-यांचा. ब्रह्मचर्यव्रताचे पालन ज्यांच्याकडून शिस्तवार झाले नाही त्यांचा. सुधारकांच्या दृष्टीने हे लोक दुर्बळ आणि भैकड.
 पण ब्रह्मचर्यव्रत जर खरोखर मान्य करावयाचे असेल तर आर्यावर्तातील केवढ्याही मोठ्या गृहस्थाश्रम्यापेक्षा असला खोटा ब्रह्मचारीही मोठाच समजला पाहिजे. जो घोड्यावर चढेल तो पडेल या ह्मणीप्रमाणे तो खरोखर मोठाच होय. ज्याने समरभूमीचे स्वप्नांतही दर्शन घेतले नाहीं-घेण्याची