पान:विवेकानंद.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सामाजिक परिषदेतील भाषणावर टीका.

२५५


उद्भवतो. स्वत्व विसरून केवळ परहितार्थ जी कामे ढोलकें न पिटतां संन्यासी करीत असतात, त्यांशी सुधारकांच्या कामगिरीची तुलना केली तर ? एकंद- रींत या डोईमुंड्यांना स्वतःच्या मोठेपणाच्या जाहिराती लावण्याची विद्या अजू- नही साध्य झाली नाहीं हेच खरें !!
 आपलें जीवित क्षणभंगुर आहे, मायामय आहे, निवळ स्वप्नवत् आहे हैं ज्ञान हिंदुमुलाला पहिल्या दिवसाच्या दुधाच्या चिरटोळीबरोबरच पाजलें जातें ! पाश्चात्त्यांचेंही मत तंतोतंत हेंच आहे. मग दोघांत फरक कसा उत्पन्न होतो ? याच मताचा आधार घेऊन पाश्चात्त्य मूल दाणतें, "जीवित क्षणभं- गुर आहे, याकरितां जीव जाईपर्यंत चैन भोगून घे, जग तर बोलून चालून दुःखाची अंधारकोठडी; याकरितां त्यांतली मिळेल तितकीच चैन आपली ह्मण. " हिंदु मूल ह्मणते, " 'हे जग निवळ बुडबुडयासारखें पोकळ-खोटें- आहे. जीवात्मा आणि परमात्मा याच सत्य वस्तू आहेत. याकरितां खोटें टाक आणि खऱ्याच्या मार्गे लाग."
 जोपर्यंत हिंदीराष्ट्राच्या मनाची ही स्थिति कायम आहे, तोपर्यंत आमच्या या आंग्लमय झालेल्या बंधूंस यशःप्राप्तीची कितपत आशा आहे बरें ? जो- पर्यंत ही स्थिति कायम असेल तोपर्यंत या विश्वांतील साऱ्या वस्तूंचा त्याग करून स्वतःच्या मुक्तीची वाट चालूं पाहणारी स्त्रीपुरुष या देशांत दिसणारच. परमेश्वर करो आणि देशाची हीच मनःस्थिति कायम राहो.
 यांनी आमच्या संन्याशांविरुद्ध जें प्रमाण ह्मणून उभे केले आहे, त्याचें तरी स्वरूप काय आहे? तें शुद्ध मढ़ें आहे. पूर्वी प्रॉटेस्टंट लोकांनी जें प्रमाण उभें केलें होतें आणि जे आमच्या बंगाली सुधारकांनी त्यांजपासून उसने घेतलें होतें, त्याचेंच हें प्रेत आमच्या मुंबईकर बंधूंनी नटवून सजवून पुढें आणलें आहे. " संन्याशाला बायकापोरें नसल्यामुळे आयुष्यांतील अनेक प्रका- रच्या अनुभवांची प्राप्ति त्याला होत नाहीं. याकरितां तो कच्चा राहतो. मुंबईपर्यंत गेलेलें हें कुजकें मढ़ें शेवटीं आरबीसमुद्रांत आतां तरी कायमची जलसमाधि घेईल अशी आह्मांस फार आशा आहे.
 आतां येथे आणखीही एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. ती ही कीं, बहुतेक पाश्चात्त्य आईबापांनी आपलीं पोरें याच संतसंतीणींच्या ( Monks and Nuns ) ताब्यांत देऊन त्यांस सुशिक्षित केले होते. अनेक प्रका- रच्या अनुभवाच्या प्राप्तीची ' इच्छाच त्यांना झाली नाहीं कीं काय नकळे.