पान:विवेकानंद.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


न्यायमूर्तीच हैं ठरवून शेवटचा निकाल अचूक आपल्या हातांत टाकतील ! पाश्चात्त्य संस्कृत पंडितांचीं विधानें वाजूस ठेवून केवळ आपल्याच बुद्धीनें न्या- यमूर्ति हें काम करतील; पण तोपर्यंत तरी आपणांला हे कोडेंच राहणार. कोंबडी आधी की अंडे आधीं या अनंतकालच्या कोड्याच्या जातीचेंच हेंही एक कोडें आहे. मग न्यायमूर्ति ते उकलतील तो सुदीन !
 या दोन जातीपैकी कोणतीही आधीं आणि कोणतीही मग निर्माण झाली असली तरी त्यांचा परस्परांशी यत्किंचितही संबंध नाहीं. दोघांचे मार्ग एक- मेकांपासून अत्यंत भिन्न आहेत.
 यज्ञयागादि कर्मों हींच ज्याप्रमाणे कर्मकांडांत प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य हें ज्ञानकांडांत प्रमुख आहे. उपनिषग्रंथ ज्यांनीं निर्माण केले, त्यांत पशूंचा वध करणारे याजी कोणीच नव्हते, असें कां ? एका बाजूला पाहावें तो गृहस्थाश्रमी ऋषी आढळतात, आणि त्यांचा तो अर्थशून्य क्रियाकलापही आढळतो. तो केवळ अर्थशून्य असता तरी बरें होतें; पण तो क्रियाकलाप भयंकरही आहे. नीतीबद्दल त्यांच्या कल्पना अत्यंत अंधुक अशा दिसतात हें कोणासही कमूल करावे लागेल. दुसऱ्या बाजूस ब्रह्मचारी आढळून येतात. त्यांना मनुष्यजातीचा अनुभव असेल अथवा नसेल; पण तो नसला तरी सनातनधर्माच्या अखंड झज्याला पाट फोडण्याचा उद्योग ते करीत अस ल्याचें दिसून येतें. ज्या झऱ्याचे पाणी आकंठ पिऊन जिनेंद्र बुद्धापासून तों आद्यशंकराचार्य, रामानुज, कवीर, चैतन्यापर्यंत अनेकांस तृप्तीचा लाभ झाला, त्या झऱ्याला पाट फोडणारे ब्रह्मचारीच होते. याच झऱ्याच्या पाण्याने अनेकांना जी अमोघ शक्ति प्राप्त झाली, तिच्या जोरावर त्यांनी अनेक प्रकारच्या आध्या- त्मिक आणि सामाजिक सुधारणा आजवर घडवून आणल्या आहेत. त्या सुधारणांच्या प्रतिबिंबाच्या प्रतिबिंवाचें पाश्चात्त्य प्रतिबिंबही इतकें जोरदार आहे कीं, त्याच्या जोरावर आमचे समाजसुधारक वीर संन्याशांवर आज शस्त्र चालवूं पहात आहेत !
 आजकालची स्थिति पाहिली तर एक प्रश्न असा उद्भवतो कीं, या भीक- माग्या संन्याशांना या हिंदुस्थानांत प्राप्ति तरी कितपत होत असावी ? समा- जसुधारकांची प्राप्ति आणि त्यांचे नागरिकत्वाचे हक्क यांची तुलना या गोसाव- ड्यांच्या प्राप्तीशी, आणि हक्काशी केली तर —? यापुढें दुसराही एक प्रश्न