पान:विवेकानंद.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सामाजिक परिषदेतील भाषणावर टीका.

२५३


केंसाचे इत्यादि अनेक प्रकार या संन्याशांत आढळतात. त्याचप्रमाणे कोणाचीं वस्त्रे आकाशी रंगाची, तर कोणाची भगवी, तिस-याचीं पिवळीं, ख्रिश्चन संन्याशांची काळी आणि इस्लामी संन्याशांची निळीं वस्त्रे, असेही अनेक भेद त्यांत आहेत. यांपैकी कित्येक नानाप्रकारे स्वतःचा छळ करून घेण्यांतच भूषण मानतात. दुसरे कित्येक असे आहेत की, शरीरें धष्टपुष्ट बनविणे हेच त्यांचे काम. त्याचप्रमाणे पूर्वकाळीं वीरसंन्यासीही असत. ज्याप्रमाणे पुरुषांत हे प्रकार आढळतात, त्याचप्रमाणे स्त्रियांतहीं संन्यासिनींचा वगं आहे. न्या. रानडे हे सामाजिक परिषदेचे अध्यक्ष तर आहेतच; पण दाक्षिण्याचेही ते मोठे चहाते असावे असे वाटते. श्रुति आणि स्मृति यांत आढळून येणा-या संन्यासिनी त्यांना सर्वथैव पसंत पडल्या आहेत असे दिसते. ब्रह्मचर्यव्रताने राहिलेल्या आणि अनेक राजांच्या दरबारी जाऊन पंडितांशी वादविवाद करणाच्या स्त्रिया पूर्वकाळीं होऊन गेल्या. प्रजा निर्माण करणे हा जो ब्रह्मदेवाचा मुख्य हेतु त्या हेतूच्या आड अशा स्त्रिया आल्या नाहीत असेही न्या. रानडे यांस वाटत असावे. त्याचप्रमाणे पुरुषसंन्याशांच्या ठिकाणीं अनुभवाचा आणि वैचित्र्याचा जो पूर्ण अभाव न्यायमूर्तीस दिसतो, तसा तो स्त्रियांच्या ठिकाणी त्यांना दिसत नाही. यावरून ब्रह्मचारिणी स्त्रिया त्यांच्या पसंतीस उतरल्या असाव्या असे अनुमान करून त्याजबद्दलचा आंधक विचार करण्याचे प्रयोजन आम्हांस नाहीं.
 न्यायमूर्तीचा निकराचा हल्ला फक्त पुरुषावरच आहे. त्या हल्लयांतून तो बिचारा कसा पार पडतो, हे आपणांस पाहणे आहे. संन्यासधर्म जो आज साच्या देशांत आणि साच्या धर्मात बोकळला आहे त्याचे उगमस्थान हा आमचा विचित्र हिंदुस्थानदेशच असावा, अशाबद्दल बहुतेक विद्वानांची एकवाक्यता झाली आहे. एकंदरीने प्रथमपासूनच हा देश विचित्र असल्यामुळे त्याला सध्या सामाजिक सुधारणेची ' जरूर भासू लागली आहे.
 वेद जितके जुने आहेत तितकेच गृहस्थाश्रमी आणि ब्रह्मचारी हेही जुने आहेत. सर्व प्रकारच्या अनुभवाने युक्त' असा सोम पिणारा गृहस्थाश्रमी ऋषी असो, अगर ‘अनुभवशून्य' ब्रह्मचारी असो; यांत आद्यस्थान कोणाला यावें हें आतां ठरविणे शक्य नाहीं. धर्ममार्गाच्या आरंभकालीं यांपैकी कोणती जात आधी निर्माण झाली हें आज ठरविणे अत्यंत दुष्कर आहे. कदाचित्