पान:विवेकानंद.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सामाजिक परिषदेंतील प्रास्ताविक


भाषणावर टीका.


 “ परमेश्वरानें हिंदी लोक निर्माण केले आणि युरोपियन लोकही त्यानेंच निर्माण केले; पण मित्रसंतति ( Mixed Breed ) निर्माण करणारा दुसराच कोणी असला पाहिजे" असे शब्द एका नास्तिक इंग्रजानें उच्चारिले असल्याचें आमच्या कानीं आलें होतें.
 न्या. रानडे यांचें सामाजिक परिषदेपुढील प्रास्ताविक भाषण आम्हांपुढे असून त्यांत हिंदी सामाजिक परिषदेच्या सर्व आकांक्षांचें प्रतिबिंब दिसत आहे. पूर्वकालीं मिश्रविवाह किती झाले, याची लांबलचक यादी त्यांत दिली आहे, पूर्वकालीन क्षत्रिय किती उदारधी होते यावद्दलही वरीच चर्चा केली आहे, आणि विद्यार्थ्यांना सुबोध केला आहे. या व्याख्यानाची भाषा खरोखर हृद- - यंगम आणि सभ्य असून त्यांत न्यायमूर्तीची कळकळही चांगली व्यक्त झाली आहे.
 व्याख्यानाच्या शेवटी शेवटीं पंजाबांतील एका नव्या जोमदार संस्थेबद्दल उल्लेख असून त्या संस्थेचें काम चालू राखण्याकरितां एखादा शिक्षकवर्ग निर्माण करण्याबद्दल जो उपदेश केला आहे, तो पाहून मात्र आम्हांस अत्यंत आश्चर्य वाटले. ही नवी संस्था म्हणजे आर्यसमाज हीच असावी असे आम्हांस • वाटते. आर्यसमाजाला न्यायमूर्तींनी केलेला उपदेश पाहून आम्हांस आरं- भींच्या वाक्याची आठवण झाली आणि असे म्हणावेंसें वाटलें कीं “परमेश्व- रानें ब्राह्मण निर्माण केले आणि त्यानेंच क्षत्रियही निर्माण केले; पण संन्या- शांना कोणीं निर्माण केलें ?"
 जगांत जितके धर्म प्रचलित आहेत त्यांत संन्यासी हे सांपडावयाचेच. .प्रत्येक धर्माने कोणत्याना कोणत्या प्रकारचे संन्यासी निर्माण करून ठेविले आहेत. हिंदुधर्मातच केवळ संन्याशांचा भरणा आहे असें नाहीं; ख्रिस्ती आणि बौद्ध धर्मातही तो आहे, एवढेच नव्हे, तर इस्लामी धर्मालाही आपल्या आज्ञा बाजूला ठेवून या संन्याशांना आपल्या पोटांत जागा द्यावी लागली. - सगळे मुंडण करणारे, कांहीं भागाचें मात्र मुंडण करणारे, जटाधारी, आंखुड