पान:विवेकानंद.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
हिंदुस्थान अज्ञानग्रस्त देश आहे काय ?

२५१


 या उत्तरांतील शेवटचा फट्कारा चांगलाच झणझणीत आहे. चेटकिणी ह्मणून निरुपद्रवी वृद्ध बायांस युरोपांत पूर्वकालीं जाळण्यांत येत असे, हें इतिहासज्ञांस सांगावयास नकोच. या हिंदुतत्त्वज्ञांच्या प्रमेयांबद्दलच्या अधिक खोल उद्घाटनांत पडण्याचे कारण आह्मांस नाहीं. त्यांतील मुख्य मुद्दा इत- काच कीं, जीवात्म्यानें परमात्मरूप व्हावें हेंच त्याचें साध्य आहे. रा. मुझुम- दार यांनी ज्या कार्यास आरंभ केला त्याची पूर्ति स्वामी विवेकानंद यांच्या हस्ते व्हावी हैं योग्यच आहे. अनेक दृष्टींनी स्वामी विवेकानंद ही व्यक्ति अलौकिक आहे यांत संशय नाहीं. बाकी हिंदुधर्माच्या दृष्टीनें व्यक्तीला महत्व नसून तें कार्याला असतें. सर्व धर्माच्या परिषदेत विवेकानंद यांस प्रत्येक दिवशीं अखेरपर्यंत राखून ठेवत असत. या युक्तीनें लोक शेवटपर्यंत बसून राहात. एखादे दिवशीं उकाडा जास्त असावा आणि त्यांतच एखाद्या वक्त्यानें आपले कंटाळवाणे चन्हाट वळीत असावें. असें झालें ह्यणजे श्रोतृसमूहांत मोठाले खाडे पडण्यास सुरवात होई. इतक्यांत सेक्रेटरींनी उठून जाही करावें कीं, समाप्तीच्या आर्धी स्वामी विवेकानंद लहानसें भाषण करणार आहेत. या युक्तीनें हजारों लोक अखेरपर्यंत चित्रासारखे बसून राहात. पांच ह लोक हातांतील पंखे हालवीत आनंदानें आणि उत्कंठेने वाट पहात असत. विवेकानंदांचें पांच सात मिनिटांचें भाषण ऐकण्याकरतां तास दोन तास चन्हऱ्हाटानें बांधून घेण्याची शिक्षा ते आनंदानें सोसावयाचे. अत्यंत सुंदर पक्कान्न शेवटी वाढावयाचें ही आचाऱ्यांची जुनी युक्ति सभेच्या अध्यक्षांस पूर्णपणे अवगत होतीसें दिसतें.