पान:विवेकानंद.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


त्यांपैकी तीन प्रश्न असे आहेत की, त्यांची उत्तरें व्यासपीठावरून दिलेलींच बरीं. ते तीन प्रश्न असेः – – हिंदु लोक आपली मुलें गंगानदीतील सुसरीपुढे टाकतात हें खरें काय?' 'जगन्नाथाच्या रथाच्या चाकाखाली ते आपणास चिरडून घेतात हे खरें काय? ते विधवा स्त्रियांस जिवंत जाळतात हें खरें काय ?? पहिला प्रश्न तर स्वामींस विचारार्ह सुद्धां वाटला नाहीं. कोणत्याही देशांतले लोक दुसऱ्यांबद्दल जे अनेक पोरकट प्रश्न विचारीत असतात त्यांपै- कींच हाही एक आहे असे त्यांचें मत दिसले. हा प्रश्न ऐकून स्वामीजी नुसते हंसले; हेंच त्याचें उत्तर. त्याचवेळी एक श्रोता ह्मणाला की, 'विशेषतः मुलीच गंगेत टाकल्या जातात, असे सांगतात. असें कां ?" त्यावर स्वामी ह्मणाले, 'मुलींचीं शरिरें कोंवळीं लुसलुशीत असतात. सुसरींना आपलें भक्ष्य चघळण्यास सोपे जावें ह्मणून मुलीच टाकतात !" दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देतांना स्वामी ह्मणाले, 'जगन्नाथाचा रथ ओढणें हें अत्यंत पुण्यकर्म आहे असें ! पुष्कळ यात्रे- करूंस वाटतें. रथ ओढण्यासाठी मी मी ह्मणून कित्येक धक्काबुक्की करून पुढे सरतात. त्या गर्दीत एखादा मनुष्य पाय घसरून पडला तर त्यावरून रथ गेला असणें संभवनीय आहे. अशी गोष्ट एखादे वेळीं घडली ह्मणजे पुष्कळ वेळां पराचा कावळा होऊन परकीयांच्या कानावर जातो आणि तेही दच- कून मागें सरतात.' तिसऱ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलें कीं, ही गोष्ट निवळ खोटी आहे. विधवा सती जात असत हैं मात्र खरें. अनेक प्रकारें समजूत घालण्याचा यत्न झाला असतांही एखादी स्त्री ऐकेनाशी झाली तर तिला पर वानगी मिळत असे. आपला नवरा जेथें गेला तेथे आपणही जावें हीच इच्छा तिच्या ठिकाणीं अत्यंत बळावलेली असे. अशा स्थितीतही संत लोक त्यांना आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याची शिकस्त करीत असत. शेवटीं अशा स्त्रीनें एक दिव्य करावयाचें असे. ते केल्यानंतर तिला परवानगी मिळे. आपला हात अग्नीच्या ज्वालांत धरून कोळसा होईपर्यंत जी स्त्री तोंडावर दुःखाचें यत्किंचित् चिन्हही न दाखवितां तो जळूं देई, तिलाच परवानगी मिळत असे. पतीच्या पाठोपाठ कोणत्यातरी रीतीनें देहपात करणाऱ्या स्त्रिया एकट्या हिंदुस्थाना- च्याच वांट्यास आल्या असें नाहीं. अशा स्त्रिया सर्व देशांत आणि सर्व कालीं झाल्या आणि आहेतही. याला तुझी आततायित्व ह्मणा अगर दुसरें कांही ह्मणा. पण या गोष्टी सर्वत्र घडल्या आहेत हैं मात्र खरें. हिंदुस्थानचे लोक विधवांना जाळीत नाहींत, अथवा चेटकिणींनाही जाळीत नाहीत.'