पान:विवेकानंद.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
हिंदुस्थान अज्ञानग्रस्त देश आहे काय ?

२४७


करून देणारे प्रचारक आह्मांस पाहिजेत. ख्रिस्ताने सांगितलेल्या संदेशाचा घोष प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत ऐकू गेला पाहिजे.” या त्यांच्या म्हणण्यावर आक्षेप घेण्याची इच्छा कोणास होईल असे वाटत नाहीं.
 मुख्य मुद्यासंबंधाने इतकी स्पष्टता दाखविल्यानंतर इतर कोणत्याही बाबीसंबंधी त्यांच्यांत व आमच्यांत मतभेद असला तरी त्या बाबी केवळ किरकोळ तपशीलाच्या आहेत असे ह्मटले पाहिजे. मूर्तिपूजकांच्या देशांतील एका मूर्तिपूजक प्रचारकाने आमच्या देशांत येऊन वरील उद्गार यथार्थपणे काढावे याहून आह्मांस अधिक लज्जास्पद ते काय असणार ? ग्रीनलंडच्या बफतील रहिवाशांपासून तों हिंदुस्थानच्या रहिवाशांपर्यंत सर्वांना आह्मी आध्यात्मिक ज्ञानदान करतो अशा बढाया मारणारांस वरील शब्दांची यथार्थता पाहून खरोखर लाजच वाटली पाहिजे. सध्या ज्या अनेक ‘सुधारणा' जगभर चालू आहेत त्यांची दशा वास्तविक अशीच आहे. ज्यांत लज्जास्पद भाग नाहीं अशी ‘सुधारणा' बहुधा कोणतीच नसेल. ख्रिस्तीधर्माचा उद्भव ज्याच्यापासून झाला त्या अवतारी पुरुषाबद्दल जे कांहीं सांगावयाचे होते ते अत्यंत योग्य शब्दांनीं स्वामी विवेकानंद यांनी सांगितले व नंतर सध्याच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांसही त्यांनी समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या. मूर्तिपूजक आणि रानटी देशांत आह्मी ख्रिस्ताच्या चरित्राचा प्रसार करीत आहों, असे भासविण्याचा यत्न जे कोणी करीत असतील त्यांनी या योग्य आणि अधिकारयुक्त उपदेशाचा विचार करावा हे उचित आहे. ख्रिस्त एक वेळ ह्मणाला “ सोने अथवा चांदी यांचा संग्रह करू नका, अथवा पितळेचाही संग्रह करू नका, अथवा आंगरखे आणि जोडे यांचाही संग्रह करू नका. जो कोणी श्रम करतो त्याचा योगक्षेम आपोआप चालतो. स्वामी विवेकानंद यांच्या आगमनापूर्वी हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांशी ज्यांची थोडीबहुत ओळख झाली असेल त्यांना स्वामींच्या शब्दांत आणि वरील ख्रिस्तवचनांत विलक्षण साम्य आढळून आले असेल. सामान्य व्यवहारांतील कार्यापासून तो धार्मिक गोष्टींपर्यंत सध्या जी व्यापारी बुद्धि आमच्यांत दिसत आहे, त्या वणिग्वृत्तीबद्दल पौर्वात्यांच्या मनांत किती तिट्कारा वसत आहे, हे स्वामींच्या शब्दांत आपणांस दिसून येते.
 आमच्या देशांतून जे शेंकडों मिशनरी-प्रचारक-परदेशांत जात असतात, त्यांनी हा मुद्दा अवश्य लक्ष्यात ठेवण्यासारखा आहे. रानटी देवांची पूजा