पान:विवेकानंद.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थान अज्ञानग्रस्त देश आहे काय ?
[ हे व्याख्यान अमेरिकेतील ‘‘बोस्टन इव्हिनिंग ट्रेन्स्क्रिप्ट पत्रांत जसे प्रसिद्ध झाले तसेच घेतले आहे. व्याख्यानांतील मुद्दे व त्यांवरील संपादकीय टीका अशा रीतीने हे प्रासद्ध झाले आहे.]

 स्वामी विवेकानंद हे डेट्रॉइट येथे नुकतेच गेले होते आणि तेथे त्यांची छापही चांगली बसली. सर्व प्रकारचे लोक त्यांच्या व्याख्यानास जमले होते आणि त्यांतही विशेषतः धंदेवाले अधिक असून स्वामीजींचे विचारगांभीर्य आणि त्यांची तर्कशुद्ध विवेचनपद्धति यांचा परिणाम श्रोत्यांच्या मनावर फारच चांगला झाला. गर्दी तर इतकी लोटली होती की व्याख्यान नाटकगृहांत झाले म्हणून बरें; नाहींतर इतर कोणत्याही ठिकाणी इतक्या श्रोत्यांची सोय लागली नसती. इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे असून त्यांना तनु आणि मन या दोहोंच्याही सौंदर्याची जोड मिळाली आहे. डेट्रॉइट येथील पत्रांनी त्यांच्या भाषणांचा रिपोर्ट बराच सविस्तरपणे प्रसिद्ध केला आहे. * डेट्रॉइट ईव्हिनिंग न्यूज' ह्मणते की, या शहरी स्वामीजींनीं जितकी व्याख्याने दिली त्यांत नाटकगृहांतील व्याख्यान सर्वात उत्कृष्ट वठले, असे सामान्य लोकमत आहे. स्वामीजींना जे काही सांगावयाचे होते, ते त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांनी सांगितले. नाटकगृहांतील त्यांच्या व्याख्यानाचा मोठा गुण म्हटला ह्मणजे संदिग्धतेचा पूर्ण अभाव हाच होय. येशूख्रिस्ताने सांगितलेला धर्म आणि सध्याचा ख्रिस्तीधर्म हे परस्परांपासून भिन्न आहेत असे स्पष्ट शब्दांनी त्यांनी श्रोत्यांच्या मनांवर बिंबविले. ते म्हणाले, “या दृष्टीने विचार केला ह्मणजे मी स्वतः ख्रिस्तधर्मानुयायी आहे पण ख्रिस्ती नाही असे ह्मणेन.” जो फरक ख्रिस्तधर्मात आणि ख्रिस्तीधर्मात आहे तोच सनातन हिंदुधर्मात आणि सध्याच्या प्रचलित-हिंदुधर्मात आहे, ही गोष्टही त्यांनी मोकळेपणाने सांगितली. ते ह्मणाले, “मी सनातन हिंदुधर्मानुयायी आहे, पण मी प्रचलित हिंदुधर्माभिमानी नाहीं.” त्यांच्या भाषणांतील आणखी एका महत्वाच्या मुद्यासंबंधाने बोलतांना ते ह्मणाले, “आह्मांला ख्रिस्ताच्या मिश-- नरींची-धर्मप्रचारकांची जरूर आहे. असे ख्रिस्ताचे प्रचारक शेंकडोंच काय, पण हजारों आले तरी आमच्या देशाला ते हवेच आहेत. ख्रिस्ताच्या वर्तनक्रमाचे रहस्य प्रत्यक्ष आचरून दाखवून त्याचा प्रवेश हिंदूंच्या हाडमास.