पान:विवेकानंद.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२४५


अभ्यासांत यश मिळविणारा लाल मात्र विरळाच सांपडावयाचा. कारण हा अभ्यास करूं जाणाऱ्यांत जे कांहीं प्रकृतिविशेष असतील त्यांवरच यशापय- शाची सारी मदार असते. धंयवांत तरी सारेच नशीब काढतात असे कोठें आहे ? पण पुष्कळांचें उखळ पांढरें झालें नाहीं तरी त्यांत भाजीभाकरीची तरी सोय लागते. त्याचप्रमाणे या मार्गात पडणारांसही त्यांतील सर्वस्वाची प्राप्ति न झाली तरी हे शास्त्र खरें आहे आणि अभ्यासानें त्यांत कोणी तरी पूर्ण यश संपादन करील इतकी पक्की खात्री होण्याइतकी प्राप्ति तरी त्याला होईल.
 आतांपर्यंत केलेले विवेचन ही या शास्त्राची नुसती रूपरेषा दाखविण्यापुरतेंच आहे. या शास्त्राची सत्यता पटण्याला कांहीं साक्षीपुराव्यांची जरूर नाहीं. स्वतःचें सत्यत्व सिद्ध करण्याची त्या शास्त्राचीच तयारी आहे. त्याला तुझी वाटेल त्या रीतीनें तावून सुलाखून ध्या. वाटेल तर त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही शास्त्राबरोबर करा. जगांत अनेक प्रकारचे ढोंगी आहेत, नाका- डोळ्यांचे वैदू आहेत, जादुगार आहेत, फसवे आणि लफंगे आहेत आणि या शास्त्रांत तर त्यांचा सुळसुळाट विशेषच आहे. असे कां? याचे कारण इतकेंच की, ज्या धंद्यांत कमाई अधिक, त्या धंद्यांत भामट्यांचा आणि खिसेकापूंचा सुळसुळाटही अधिक. पण एखाद्या धंद्यांत लुच्चेगिरी अधिक प्रमाणावर चालली तरी त्यामुळे तो धंदाच खोटा-त्याज्य-असे म्हणतां येत नाहीं.
 आतां लक्ष्यांत ठेवण्यासारखी एकच गोष्ट सांगावयाची राहिली, ती ही कीं, चमत्कारांबद्दल बौद्धिक विवेचन ऐकणे आणि त्यासाठी लागणाऱ्या बुद्धीच्या मलखांबावरील उड्या पाहणें हें थोडा वेळ सुखदायी वाटत असले तरी त्याचा प्रत्यक्ष उपयोग मात्र फारसा नाहीं. जर कोणाला अभ्यास करण्याची इच्छा. असेल तर नुसती व्याख्याने जन्मभर ऐकून कांहीही फायदा होणार नाही. या गोष्टी व्याख्यानांनी उमजण्यासारख्याच नाहीत. अभ्यास करावयाचा ह्मणजे जडबुद्धीच्या पलीकडे उडी मारून जीवात्म्याची गांठ घ्यावयाची आहे. जीवा- त्माच जीवात्म्याची गांठ घेऊं शकेल. जर अभ्यास करण्याचा तुह्मांपैकी कोणाचा पक्का निश्चय असेल तर त्याला मदत करण्यास मी आनंदानें तयार आहे.