पान:विवेकानंद.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


तीस वर्षे सतत खर्ची पडलीं आहेत. आणि आज सहा वर्षे ही तुटपुंजी माहिती मीं लोकांस देत आहें. तीस वर्षे अनंत यातना सोसून आणि हाडांची कार्डे करून मी थोडीशी माहिती पैदा केली. कित्येक वेळां चोवीस तासांपैकी वीस तास एकसारखा अभ्यास मला करावा लागे. कित्येक वेळां साया रात्रीत एखादा तास मी आंग आडवें करीत असे. कित्येक वेळां सारी रात्र माझा अभ्यास चाले. कित्येक वेळां मी अशा जागीं राहीं कीं, तेथें मनुष्याचा शब्द अथवा श्वासही ऐकूं येऊं नये. कित्येक वेळां मला एखाद्या अंधाऱ्या गुहेत राहावें लागे. या साऱ्या गोष्टींचा क्षणमात्र आपल्या चित्तांत विचार करा. आणि इतकें करूनही मला जो लाभ झाला आहे तो जवळ जवळ 'नाही' इतक्याच योग्यतेचा आहे. या सागरस्वरूपशास्त्राच्या किनाऱ्यापर्यंतसुद्धां गेलों असेन अथवा नसेन. त्याच्या लाटांची खळाळीही माझ्या कर्णपथावर नीटशी येत नाहीं. या पुरातनवंस्त्राच्या एका दशीचाही लाभ मला अद्यापि झालेला नाहीं. मला जो कांहीं लाभ झाला तो इतकाच की, हे शास्त्र खरें आहे, अफाट आहे आणि अतर्क्य आहे, इतकी मात्र माझी बालंबाल खात्री झाली आहे.
 जर या शास्त्राचा अभ्यास कोणास खरोखरच करावयाचा असेल तर आपल्या धंद्यांत यश मिळण्यासाठी जी धडपड तो करतो आणि जी चिकाटी तो दाख वितो त्याहून अधिक धडपड करून अधिक प्रमाणाची चिकाटी त्यानें दाखविली पाहिजे. धंद्यांत आपणांस किती दक्षता ठेवावी लागते आणि कसें दोरींत बांध- ल्यासारखें वागावें लागतें तें पहा. वाप मरो, आई मरो, बायको मरो अथवा पोर उलथून जावो, धंद्याला खळ म्हणून नाहींच. आपलें अंतःकरण दुभंग होण्याची वेळ असली तरी धंदा म्हटला कीं अंतःकरणाला कसाबसा बांध घालून वेळेवर हजर राहिलेच पाहिजे. अशा वेळी प्रत्येक क्षण म्हणजे अंत:- करणांत एक एक बाण खोंचला जात आहे असे वाटत असतें ! पण करणार काय ? धंदा तो धंदाच ! त्याला तुमचें अंतःकरण वगैरे कांहीं समजतच नाहीं. आपण सारे लोक याच रीतीने वागत असतो आणि हें असेंच असले पाहिजे असेंही म्हणतों !
 जगांतल्या कोणत्याही धंद्याला न लागणारें अंतःकरणाचें काठिन्य या शास्त्राच्या अभ्यासाकरितां पाहिजे. धंद्यांत यश मिळविणें याला कांहीं मोठी कर्तबगारी लागतेच असें नाहीं. पुष्कळ मनुष्यें तें करूं शकतात. पण या