पान:विवेकानंद.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२४१


इंग्रजी नांवेंही संस्कृत नांवावरून बनविली आहेत. त्याचप्रमाणे वीजगणिताचा जन्मही हिंदुस्थानांतच झाला. न्यूटन जन्माला येण्याच्या अगोदर हजारों वर्षे गुरुत्वाकर्षणाचा नियम हिंदु लोकांस ठाऊक होता.
 यावरून हिंदु लोकांची मनोभूमिका कशा प्रकारची आहे, याची कल्पना आपणांस होईल. भारतीय इतिहासांतील एका काळी आर्यांचे सगळे चित्त मानवी मनाच्या सामर्थ्याचा शोध लावण्यांत गुंतलें होतें. हा विषयही अत्यंत चित्ताकर्षक असाच आहे. कारण हे शास्त्र सिद्ध झालें तर आपल्या सर्व आकांक्षा पुन्या होण्यास अगदी जवळचा मार्ग सांपडल्यासारखेंच झालें, असे त्यांस वाटले. 'कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम्' अशी शक्ति मानवी मनाला आहे, आणि हें सामर्थ्य ह्मणजे काकतालीयन्याय असे नसून निश्चित नियमा नुसारें या गोष्टी घडतात. याबद्दल पूर्वकालीन आर्याची इतकी बालंबाल खात्री झाली होती कीं, बाकीचे सर्व विषय सोडून याच शास्त्राचा शोध ते करूं लागले. मंत्रतंत्र, जादुटोणे इत्यादि प्रकार या विलक्षण गोष्टी नसून तें शुद्ध शास्त्र आहे असे त्यांनीं सिद्ध केलें. ज्याप्रमाणे इतर भौतिकशास्त्रांचे सिद्धांत त्यांनीं त्यापूर्वी स्थापित केले होते, त्याचप्रमाणें या गोष्टीही विशेष नियमांस अनुसरूनच घडतात असे त्यांनी सिद्ध केलें. या स्थितीचा परिणाम साऱ्या आर्यशाखेवर अनिवार्यपणे घडून आला. इतर भौतिकशास्त्रांवरील आर्यशा- खेचें लक्ष्य इतकें उडून गेलें कीं, तीं शास्त्रें मागे पडत पडत सर्वथा नष्ट होण्याच्या मार्गाला लागली. त्यांचें सारें लक्ष्य या एकाच शास्त्राच्या वाढी- कडे लागले. योग्यांचे निरनिराळे पंथ उपस्थित झाले, आणि निरनिराळ्या मार्गानी या शास्त्राचा शोध त्यांनी चालविला. कित्येकांनी प्रकाशकिरणांचा अभ्यास सुरू केला. निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशकिरणांचा परिणाम शरि- रावर कोणत्या प्रकारचा होतो, हें ते शोधून काढू लागले. कांहीं विशेष रंगांची वस्त्रे मात्र वापरावयाचीं, कांहीं विशेष रंग कृत्रिमरीतीनें एखाद्या स्थलाला देऊन तेथेंच राहावयाचें आणि विशेष रंगांचे पदार्थ मात्र खावयाचे अशा रीतीनें ते राहू लागले. कित्येकांनी ध्वनींचा अभ्यास केला. कानांत गुडद्या घालून आंतून येणारा ध्वनि ऐकावा व मग गुडद्या टाकून पुन्हा त्याच ध्वनी- कडे लक्ष्य लावावें असा अभ्यास ते करूं लागले. कित्येकांनीं निरनिराळ्या वासांचा अभ्यास केला. अशाच रीतीनें ज्ञानेंद्रियांच्या सर्व विषयांच्या अभ्या- साला सुरवात झाली.
 स्वा. वि. सं. ३-१६