पान:विवेकानंद.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


नाहीं; पण त्याच मनुष्यानें तुह्मांला स्वतःला तसलें सामर्थ्य तीन आठवड्यांत प्राप्त करून दिलें तर ? असल्या गोष्टी शिकविणे कठीण नाहीं. दुसऱ्याच्या मनांत काय चालले आहे हे जाणण्याची कला अवध्या पांचच मिनिटांत साध्य होते. या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवाच्या पुराव्यानें सिद्ध होण्याजोग्या आहेत.
 जर या गोष्टी पुराव्यानें सिद्ध होत आहेत तर वाढीची मर्यादा तरी कशी ठरवावी ? जर या खोलीच्या कोपऱ्यांत वसलेल्या मनुष्याच्या मनांतील विचार एखाद्याला समजले तर शेजारच्या खोलीतील मनुष्याच्या मनांतील विचारही कां समजूं नयेत? किंबहुना विश्वाच्या कोणत्याही भागांतील मनुष्याचे विचार त्याला कां कळूं नयेत? नाहीं म्हणावयाला आह्मांला कांहीं अधिकार नाहीं. हें शक्य नाहींच असें ह्मणण्याची आमची कांहीं छाती नाहीं. फार झालें तर, ‘हैं कसें होतें तें आम्हांस समजत नाहीं' इतकेंच अपणांस ह्मणतां येईल. तुझी केवढेही वडे जडशास्त्री असा. हे अशक्य आहे असें तुह्मांस ठांसून सांगतां येणारच नाहीं. 'आह्मांला ठाऊक नाही' इतकेंच पाहिजे तर ह्मणा. शास्त्रे कशीं निर्माण होतात ? प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टी जमा करणे, त्यांची जातवारी लावून त्यांना त्यांच्या विशिष्ट पंक्तीत बसविणें, नंतर त्यांवरून सिद्धांत काढणें आणि शेवटीं सत्य शोधून काढणे, या पद्धतीने शास्त्रे निर्माण होतात आणि वाढतात. पण प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टी मुळांतच जर आपण अशक्य कोटींत बसवूं लागलों तर शास्त्र निर्माण तरी कसें होणार? 'अमुक गोष्ट झूठ, अमुक गोष्ट घडणें शक्यच नाहीं' अशा रीतीनें प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींची वासलात आपण लावूं लागलों तर भावी शास्त्राचा उच्छेद आपण मुळांतच केला असें होत नाही काय ?
 मानवीमनाचें सामर्थ्य अचिंत्य आहे, 'नरकरणी करे तो नरका नारायण होत' हा आह्मा हिंदूंचा पहिला सिद्धांत आहे. हिंदूंच्या मनोभूमिकेची रचना कांहीं विशिष्ट तत्त्वांस अनुसरून झाली आहे. एखाद्या विशेष गोष्टीकडे त्यांचें चित्त वेधलें तर त्याच गोष्टीचें चिंतन ते करतील. कांहीं काळपर्यंत बाकीच्या जगाचें भानच त्यांस जणुं काय नाहींसें होतें. अनेक प्रकारच्या शास्त्रांची 'जन्मभूमि हिंदुस्थान हीच आहे ही गोष्ट आपणा सर्वास ठाऊक आहे. गणि- तशास्त्र प्रथम तेथेंच निर्माण झाले. एक, दोन, तीन इत्यादि आंकड्यांची