पान:विवेकानंद.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२३९


जर या कायद्यांची समग्र माहिती आपणांस मिळाली, आपण ती ऐकली,. तिचा पुरा शोध केला आणि लाप्रमाणें अक्षरशः वागलों तर? तर काय, याच क्षणीं मुक्ति, हें ओघालाच आलें. आपली वाढ झपाट्यानें होईल, आणि याच जन्मीं आपण पूर्णत्व पावूं. आपल्या जीवनक्रमांतील अत्युच्च रहस्याचें हें शास्त्र आहे. मनाचा अभ्यास करून आणि त्याच्या ठिकाणी गोचर होणाऱ्या शक्तीचा अभ्यास करून करावयाचें काय ? पूर्णत्व मिळवावयाचें हेंच. या अभ्यासाचें अंतिम साध्य हेंच आहे. कोणाला पैशाची मदत करणें, कोणाला कपडेलत्ते वांटणें अथवा कांही इतर मार्गानी कोणाच्या जीवितया- त्रेच्या मार्गातील निवडुंग नाहींसे करणें या बाबी केवळ उपांगांसारख्या आहेत.
 मनुष्यांतील पूर्णल व्यक्त करणे हा या शास्त्राचा उपयोग आहे. या शा- स्त्राच्या अभावीं त्याला स्वतःचा रस्ता तोडावयास लक्षावधि वर्षे लागतील.. त्या अवधीत त्याला कित्येकांचें खेळणे होऊन बसावे लागेल. एखादा लांक- डाचा ओंडका समुद्रांत पडला म्हणजे प्रत्येक लाटेबरोबर तो जसा खालींवर आणि इकडेतिकडे होतो, तसे त्याला डुबकत पडावें लागेल. 'उठा, सशक्त व्हा' असें हें शास्त्र आपणांस सांगत आहे. हा कार्यभार स्वतःच्या शिरावर ध्या, इतके दिवस ही कामगिरी तुम्ही प्रकृतीकडे सोपविली होती, पण आतां ती आपल्या हाती घ्या, आणि एकाच उडीनें हा संसारसमुद्र उल्लंघून जा. या शास्त्राचें सांगणें हेंच आहे.
 मनुष्याचें ज्ञान एकसारखें वाढत आहे आणि त्याबरोबरच त्याचें सामर्थ्य आणि सुख हीं सुद्धां वाढत आहेत. एखाद्या सबंध शाखेच्या दृष्टीनें हैं ह्मणणें खरें आहे. अगदीं अक्षरश: खरें आहे. पण व्यक्तीबद्दलही असेंच म्हणतां येईल काय ? अंशतः होय असे उत्तर आम्हांस द्यावें लागेल. पण येथे एक निराळाच प्रश्न उपस्थित होतो, तो हा कीं, व्यक्तीची मर्यादा ठरविण्याला तुमच्याजवळ काय साधन आहे ? कोण मनुष्य किती वाढला आहे हे ठरवि- ण्याचा एखादा कांटा तुमच्याजवळ आहे काय ? आपणा सामान्य मनुष्यांना कांहीं थोड्याशा अंतरापलीकडे दिसत नाहीं; पण मीं एक मनुष्य असा पाहिला आहे की शेजारच्या खोलींत काय चालले आहे हे त्याला डोळे मिटुन दिसतें. तुह्मी कदाचित् म्हणाल कीं, यावर आमचा विश्वास बसत