पान:विवेकानंद.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


ल्यामुळे एका मनावर ताबा मिळवितां आला, तर तद्द्वारा विश्वव्यापी मनावर ताबा मिळविणे अशक्य नाहीं. मातीच्या लहानशा ढेंकळावरून मोठ्या ढिगाची कल्पना सहज होऊं शकते. स्वतःच्या मनावर ताबा कसा चालवावा या विद्येचें रहस्य ज्यानें एकवार हस्तगत करून घेतले असेल, त्याला विश्वव्यापी मनावरही अवश्य ताबा चालवितां येईल.
 याच प्रश्नाला आणखीही एक व्यवहार्यरूपाची बाजू आहे. आपणांस जी अनेक प्रकारचीं शारीरिक दु:खें भोगावी लागतात तींही मनोनिग्रहानें टळ- ण्याजोगी आहेत. जर शक्तीच्या सूक्ष्मरूपावर आपणांस जय मिळवितां आला, तर अनेक मानसिक दुःखांचा परिहारही आपणांस करतां येईल. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या कार्यात आपणांस जें अपयश प्राप्त होतें तेंही टाळतां येईल. सूक्ष्मशक्तींवर आपणांस जय मिळवितां आला, तर त्याचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारांतही अनेक प्रकारें खास करता येईल; पण व्यवहार बाजूला ठेवून, याहून या प्रश्नाचें जें अधिक उच्चरूप आहे त्याकडे वळूं.
 आतां एका उपपत्तीविषयीं कांही माहिती आपणांस मी सांगणार आहे; पण त्या उपपत्तीबद्दल सांगोपांग चर्चा करण्याचा माझा विचार नसून, तीसंबंधीं कांहीं अंतिम सिद्धांत मात्र आपणांस मी सांगणार आहे. मानवकुलांतील एखाद्या शाखेची वाढ ज्या प्रकारें झाली असेल त्याच प्रकारानें त्या शाखेतील प्रत्येक मनुष्याची वाढ त्याच्या बाल्यापासून होत असते. अत्यंत रानटी स्थितींतून बाहेर पडून बऱ्याच प्रकारच्या परिणतावस्थेला पोहोचलेली अशी एखादी शाखा पाहिली, तर तिच्या पहिल्या स्थितीपासून तो थेट चालू अवस्थेपर्यंत जितक्या प्रकारच्या अवस्थांतरांतून ती गेली असेल तितक्या अवस्थांतरांतून तिच्यांतील प्रत्येक व्यक्ति आपल्या बाल्यापासून जात असते असे आपणांस आढळून येईल. यांतील व्यष्टि आणि समष्टि यांच्या वाढीत कालांतराचा मात्र भेद असतो. जी परिणतावस्था प्राप्त करून घेण्याकरितां समष्टीला हजारों वर्षे लागलीं तीच स्थिति कांहीं थोड्याशा वर्षांच्या अवधीत व्यष्टीला प्राप्त होते. त्या शाखेतील एखादें लहानसें मूल पाहिले तर त्याच्या ठिकाणी शुद्ध रानटी- पणाची स्थिति आढळून येईल. एखाद्या फुलपांखराला मूल सहज लीलेनें चिर- डून टाकतें. हा रानटीपणाचा मूळ अंश आहे. त्या मानवशाखेच्या आरंभ- कालींच्या स्थितीसारखी ही बाल्यावस्था असते. बाल्य जाऊं लागून व जसजसें