पान:विवेकानंद.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२३५


शक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो आणि त्यामुळे ती शक्ति त्या स्थूलरूपांतच असावी असा भ्रम पडतो. स्थूलवस्तु हे शक्तीचे अधिष्ठान नसून तिचें प्रकट होण्याचें एक द्वार मात्र आहे. अत्यंत सूक्ष्मरूपांतील शक्ति आपल्या प्रत्ययास येत नाहीं याचें कारण, तेथील शक्तिस्पंद अत्यंत झपाट्याचे असतात; इतके कीं, आपली स्थूलदृष्टि त्यांवर स्थिर होऊं शकत नाहीं. या सूक्ष्मरूपाचें नियमन करता येईल अशी कांहीं युक्ति आपणांस सांपडली तर स्थूलरूपाचें नियमनही आपणांस सहज करता येईल हें उघड आहे. एखाद्या तळ्याच्या तळभागांतून बुडबुडा वर येत असला तर तो पृष्ठभागावर येऊन फुटेपर्यंत आपणांस दिसत नाहीं. त्याचप्रमाणें शक्तीचें रूप अत्यंत सूक्ष्म असतें, तोपर्यंत त्याचा प्रत्यय आपणांस येत नाहीं; पण तीच शक्ति आपले मूळ अधिष्ठान सोडून स्थूलाकडे येऊं लागली म्हणजे तिचा प्रत्यय येऊं लागतो. अधिष्टानापासून तिचें अंतर जो जो वाढत जातें, तो तो तिचें स्वरूप अधिक स्थूल होत जातें आणि त्यामुळे तिचा प्रत्यय आपणांस अधिक उघड रूपानें होतो. विचार निर्माण कसा होतो आणि केव्हां होतो ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत कधींच येत नाहीं; पण अधिष्ठान सोडून तो बराच लांव आला म्हणजे त्याचा प्रत्यय आपणांस होतो; आणि तोच स्थूल- रूपांत प्रकट झाला म्हणजे जड डोळ्यांनाही दिसूं लागतो. आपल्या विचारां- वर आणि कृतींवर आपला ताबा चालत नाहीं अशी तक्रार आपण वारंवार करीत असतो. जर विचाराचा प्रत्यक्ष प्रत्यय येण्यापूर्वी त्याच्या मुळाशींच त्याचें नियमन आपणांस करतां आलें, तर विचारांचें आणि त्यांचेंच प्रत्यक्ष रूप ज्या कृती त्यांचेही नियमन आपणांस एकाच वेळी करता येईल. जर कोणत्या तरी साधनांच्याद्वारे आपणांस शक्तीच्या सूक्ष्मरूपाचें पृथक्करण करता येईल, त्यांचें स्वरूप निश्चितपणे जाणतां येईल व त्यावर तावा चालवितां येईल, तर आपल्या मनावरही आपला ताबा चालू शकेल. ज्या मनुष्याला स्वतःच्या मनावर ताबा चालविण्याचे सामर्थ्य प्राप्त झालें तो मनुष्य इतर मनांवरही ताबा चालवूं शकेल. अंतर्वाह्य शुचिता आणि उच्च नीतिमत्ता यांचें प्रतिपादन धर्मानें एवढ्या अड्डाहासानें कां केलें आहे हे आतां आपल्या लक्ष्यांत आले असेलच. जो मनुष्य अंतर्बाह्य शुद्ध आणि नीतिमान् असतो तो मनोनिग्रही अवश्य असतोच; कारण अंतर्बाह्य शुद्धि आणि नीतिमत्ता हीं मनोनिग्रहावांचून प्राप्त होणें शक्यच नाहीं. सर्व मनें हीं एकाच विश्वव्यापी मनांतून अंशरूपानें उद्भवली अस