पान:विवेकानंद.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचे सामर्थ्य.

२३३


ती बुद्धीच्या सरहद्दीवर होते. त्यापलीकडे आपण त्यांच्या हृदयांत शिरू शकत नाहीं. उलट पक्षी महात्म्यांचे विशिष्टत्व अत्यंत अंतर्वत असल्यामुळे त्यांची भेट म्हणजे त्यांच्या अंतरात्म्याची भेट घेणेच होय. पंडितांच्या अंतरात्म्याची व आमची भेट कधीच होत नाहीं, यामुळे त्यांजबद्दल फारसे प्रेमही आपणांस वाटत नाही. उलटपक्षी महात्म्यांची भेट ह्मणजे त्यांच्या अंतरात्म्याची भेट होत असल्यामुळे आपले मन त्यांजकडे अनिवार्यपणे ओढ घेऊ लागते. पंडितांचे विशिष्टत्व बुद्धीच्या सरहद्दीवर येऊन बसलेले असते. आपला मध्यबिंदु सोडून ते कांहीं अंतरावर येऊन ते आपली भेट घेते. बुद्धि में इंद्रिय आहे ही मानवी हृदयांतील एक बनावट चीज आहे. तिचा स्पर्श म्हणजे रसायनशास्त्रांतील एखाद्या पदार्थाचा स्पर्शच होय. तो हळुहळु कार्य करीत असतो आणि योग्य परिस्थिति सांपडल्यास कोठे एखादी अंधुक ज्योति निर्माण करतो; अथवा अनुकूल परिस्थितीच्या अभावीं स्वतः नाहीसा होतो. उलट पक्षी महात्म्यांचे विशिष्टत्व त्यांच्या मध्यबिंदूंतच असल्यामुळे त्याची भेट होण्याबरोबर अपल्या हृदयांतही प्रकाश निर्माण होतो. एक मोठी मशाल पटेली असली म्हणजे जसे तीवर हजारों दिवे लागतात, त्याचप्रमाणे एक महात्मा लक्षावधि लोकांस आपल्या दर्शनमात्रे जागति आणतो.
 ज्या नियमांनीं मनुष्यांतील हे विशिष्टत्व वाढीस लागते, ते नियम आपण शोधून काढले आहेत, असे योगशास्त्राचे म्हणणे आहे. त्या नियमांकडे योग्य लक्ष्य पुरवून व त्यांनी आंखून दिलेल्या मार्गाने जाऊन हें विशिष्टत्व प्रत्येक मनुष्याला प्राप्त करून घेता येण्यासारखे आहे, असे योगशास्त्र सांगत आहे. सर्व शिक्षणमागचे रहस्य हेच आहे. या नुसत्या उपपत्ती आहेत असे समजू नये. या शुद्ध व्यवहार्य गोष्टी आहेत. या उपपत्ती प्रत्यक्ष आचाराकरितांच निर्माण झाल्या आहेत. तसेच या उपपत्ती एखाद्या विशिष्ट स्थली अथवा एखाद्या विशिष्ट कालींच लागू पडतात असे नाही, तर त्या कालस्थलातीत शास्त्राच्या उपपत्ती आहेत. त्या सर्व स्थली आणि सर्व काली एकसारख्याच लागू पडतात. कोणी संसारी असो वा संन्यासी असो; श्रीमंत असो वा दरिद्री असो; लौकिक कामधंद्यांत पडलेला असो वा कसलाही उद्योग करीत असो; त्याने आपलें विशिष्टत्व पक्के करणे-त्याचे स्वरूप दृढतर करणें-हेच त्याला श्रेयस्कर आहे. त्याच्या आयुष्यात त्याचे कांहीं मोठे कर्तव्य तें हेंच. जडविश्वाचे नियम