पान:विवेकानंद.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२३१


त्यांच्या ग्रंथांचा सूक्ष्मपणें आढावा काढला तर आपणांस काय आढळून येतें ? जगांत जितके तत्त्ववेत्ते आजपर्यंत होऊन गेले, त्यांच्या साऱ्या ग्रंथांचा निष्कर्ष काढिला तर खरोखर अगदी अस्सल आणि नवीन अशीं विचाररत्ने फार तर मूठभर सांपडतील. कित्येक ग्रंथकार, मोठे झणून स्वतःच्या काळी नांवाजले गेले होते, त्यांचा कीर्तिडिंडिम आजतागाईत आपल्या कानांवर येत आहे; पण त्यांचे ग्रंथ पाहिले तर त्यांवरून ते एवढे मोठे विशाल बुद्धीचे असावेत असे आपणांस वाटत नाही. त्यांच्या ग्रंथांचा खरा दर्जा पाहिला तर सरासरीच लागेल. तथापि स्वत:च्या हयातीत त्यांनी मोठें नांव मिळविले हे मात्र खरें. या त्यांच्या कीर्तीचें रहस्य पाहूं गेलें तर तें त्यांच्या विचारसौंदर्यात नसून त्यांच्या व्यक्तिविशेषांत होतें असे आपणांस आढळून येईल. त्यांचे विचार अथवा त्यांची भाषणें, हें त्यांच्या कीर्तीचें कारण नव्हे. ती आपल्यासमोर आजही आहेत, आणि जर ही कीर्ति केवळ विचारांवर अगर भाषणांवर अवलंबून असती तर त्यांच्या ग्रंथांनीही आपल्या मनासही जिंकलें असतें, पण तसे होत नाहीं; त्या अर्थी आतां जें कांहीं अदृश्य स्थितीस गेलें आहे, तेंच त्यांच्या कीर्तीचें रहस्य असले पाहिजे. मनुष्याला जें कांहीं यश मिळतें त्यांत बुद्धीच्या वांट्याला तृतीयांश आणि व्यक्तिविशिष्टत्वाच्या वांट्याला बाकीचा दोन तृतीयांश भाग येतो हे मी अगोदर सांगितलेंच आहे. आपल्यावर अत्यंत परिणाम व्यक्तिविशिष्टत्वाचाच होतो. केवळ कृतीचा होत नाही. व्यक्तिविशि- ष्टत्व हें कारणरूप असून कृति कार्यरूप आहे. कारणाचें अस्तित्व असले की कार्य घडावयाचेंच. व्यक्तित्व शिल्लक आहे तोपर्यंत कृति आपोआपच घडत राहाते. महत्व जें काय आहे ते कृतीला नसून व्यक्तीला असतें.
 आपल्या साऱ्या शिक्षणक्रमाची दिशा या मूलभूत तत्त्वाला धरून ठरवि लेली असावी. विद्यार्थिगणांतून व्यक्तिविशेष तयार करावयाचे, हा शिक्षणाचा उद्देश असावा. पण आपला शिक्षणक्रम पाहिला तर त्याचा उद्देश बाह्य लख- लखीतपणा उत्पन्न करण्याकडे असतो. प्रेक्षकाचे डोळे दिपले झणजे झाले. पण अशा स्थितीत आंतली पोकळी कशी भरून निघणार ? मनुष्याची वाढ व्हावी, त्यानें दिवसेंदिवस विस्तार पावावें हा शिक्षणाचा हेतु आहे. आपल्या आस- पासच्या मनुष्यांना भारून टाकील अशा प्रकारचे जादुगार आपण निर्माण केले पाहिजेत. अशी माणसें ह्रीं चालतीं बोलतीं विद्युदुत्पादक यंत्रच होत. ह्रीं