पान:विवेकानंद.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


क्यांत दुसरा एखादा मनुष्य येतो; थोडा वेळ चार वाक्यें बोलतो; त्यांत तादृश माधुर्य नसतें; कदाचित् व्याकरणाच्यासुद्धां चुका असतात; पण तुमच्या मनावर तो मोठा परिणाम करतो ! असल्या प्रकारच्या गोष्टी अनेकवार आपल्या अनुभवास आल्या असतील. एखाद्या मनुष्याचें वजन दुसऱ्यावर पडतें यांत शब्द आणि विचार यांचा फारच थोडा भाग असतो- सुमारें एकतृतीयांश असतो असें ह्मणूं; आणि वार्काचें कार्य त्या माणसांतील पुरुषत्वामुळे घडून आलेलें असतें. त्या विशिष्ट व्यक्तींत जें कांहीं तेज-अथवा शास्त्रीय भाषेत बोलावयाचें ह्मटलें तर चुंवकत्व (Magnetism ) - असतें, तेंच तुमच्यावर अंमल बजावीत असतें. तुमच्याशीं तो भाषण करीत असतां त्याचें चुंबकत्व बाहेर पडत असतें व तुमच्या मनाला ओढीत असतें.
 एखाद्या कुटुंबांत पांचचार कर्तेसवरते पुरुष असतात. त्यांपैकी कांहींचा उद्योग यशस्वी होतो आणि बाकीच्यांचा होत नाहीं. असें कां ? ज्यांचा उद्योग यशस्वी होत नाहीं ते दुसऱ्या कोणाच्या तरी गळीं त्या अपयशाचें खापर बांधीत असतात. एखाद्या कामांत यश येत नाहीं असें वाटल्यावरोवर-अमक्या, तमक्याच्या अमुक कृतीमुळे माझा डाव फसला असें ते ह्मणूं लागतात. स्व तःच्या अपयशाचा वांटा स्वतःच उचलण्याची फार करून कोणाची तयारी नसते. आपल्या हातून कसलीच चूक झाली नाहीं असें भासविण्याचा आपला सर्वांचा यत्न असतो. जो काय दोष असेल तो दुसऱ्या एखाद्या मनुष्याचा अथवा विशिष्ट परिस्थितीचा आणि हेंही जमण्यासारखें नसेल तर साया अपयशाचे श्रेय उचलण्यास बिचारें नशीव तयार आहेच ! ' काय करावें, आमचें नशीव ' असें झटले ह्मणजे भागले. एखाद्या कुटुंबांतल्या मुख्य कर्त्या पुरुषाला अपयश आलें तर त्यानें अंसा विचार करावा कीं, दुसरे कित्येक जे आपला कुटुंबभार उत्तम रीतीनें उचलीत आहेत तें कां ? कित्येक जण यशस्वी आणि दुसरे अपेशी, असें कां ? या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या कर्तबगारीवर आणि विशिष्टत्वावर अवलंबून असतात असे आपणांस आढळून येईल.
 मानवकुलाच्या एखाद्या मोठ्या भागाचें धुरीणत्व ज्यांकडे होतें अथवा आहे, अशा मनुष्यांच्या चरित्राचा विचार केला तरीही हेंच तत्त्व आपणांस आढळून येईल. त्यांचें विशिष्टत्व- असामान्यत्व-त्यांच्या उपयोगी पडत अस ल्याचें दिसून येईल. पूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या तत्त्ववेत्त्यांची चरित्रें पहा.