पान:विवेकानंद.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२२९


कडे जातात आणि तेथें आपण त्या विरलस्पंदांस एकत्र केले, म्हणजे पुन्हा त्यांना त्यांचें जड विचाररूप प्राप्त होतें. माझे विचार आपल्या मनांत प्रवेश करतात ही एक क्रिया झाली; परंतु ही क्रिया होण्यास तिच्या पोटांत दुसऱ्या दोन क्रिया व्हाव्या लागतात. प्रथम, विचारास स्पंदरूप प्राप्त होते आणि नंतर स्पंदरूपाचें पुन्हा विचाररूपांत रूपांतर होतें. यावरून माझे विचार आपणांस सरळ रस्त्यानें न पोहोंचतां वेड्यावांकड्या लांबच्या पल्याने येऊन पोहोंचतात; परंतु प्रेरणेनें झालेलें विचारसंक्रमण सरळ मार्गानें होतें.
 जगांतील सर्व मनांचा परस्परांशी संबंध असून, सर्व मनांचा विश्वव्यापी मनाशी संबंध आहे असें जें योग्यांचें ह्मणणे आहे तें खरें असावें असें याव रून दिसतें. असा परस्परसंबंध सर्वत्र असल्यामुळे प्रत्येक मन विश्वव्यापी आहे, असा योग्यांचा सिद्धांत आहे. तुमचें मन, माझें मन आणि जगांतील सारीं मनें ह्रीं त्या विश्वव्यापी मनाचीं लहान लहान शकले आहेत. एखाद्या प्रचंड समुद्रावर ज्याप्रमाणे लहान लहान लाटा सर्वत्र उठलेल्या असतात, त्याचप्रमाणें विश्वव्यापी मनावर आपलीं मनें हीं लहान लहान लाटांसारखी उठलीं आहेत. अशा रीतीनें सर्व मनांचा परस्परांशी संबंध असल्यामुळे त्यांतील विचारांचेंही संक्रमण सरळपणें होऊं शकतें.
 आपल्याभोंवतीं प्रत्येक क्षणीं काय घडामोडी होत आहेत, याकडे क्षणभर लक्ष्य देऊं या. आपल्याभोवती जें अफाट जग पसरलें आहे, त्याचा अंमल आप- णावर एक पक्षी सुरू आहे. आपल्या चालकशक्तींतील कांहीं भागाचा व्यय आपल्या शरिराच्या संरक्षणार्थ आपण करीत असतों, आणि बाकीच्या साऱ्या शक्तीचा व्यय रात्रंदिवस दुसऱ्यांवर अंमल चालविण्यांत खर्ची पडत असतो ! आपले शरीर, आपलें मन, आपले सद्गुण, आपले दुर्गुण आणि आपल्या धार्मिक भावना, या एकसारख्या आपल्या बाहेरील जगावर अंमल चालवीत असतात. एखाद्या प्रत्यक्ष उदाहरणानें ही उपपत्ति अधिक चांगली समजते की काय हे पाहूं. एखादा मनुष्य तुमच्याकडे येतो; तो चांगला विद्वान आहे हें तुह्मांस ठाऊक असतें. तो एखादा तास तुमच्याशी एखाद्या विषयावर भाषण करतो; त्याची भाषा गोड आणि विचार सुंदर असतात; पण त्याचें तुमच्या- वर यत्किंचितूही वजन पडत नाहीं. तो निघून गेला ह्मणजे तुह्मी अगदी पहिल्यासारखे थंड असतां. जणूंकाय कोणी मनुष्य आलाच नव्हता ! इत-