पान:विवेकानंद.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

-~-~ ~ - ~-

१४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.
[तृतीय

शोधाकरितां ज्यांनी आपले सारे आयुष्य वेंचिले त्यांचे समाधान या कल्पनेने होणार नाहीं.
  यानंतर परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध केवळ बाह्य जगांत भटकून लागणार नाही असे हिंदूस आढळून आले आणि ही बाह्य सृष्टि सोडून ते अंतःसृष्टीचा शोध करू लागले. या सृष्टीच्या शोधाला सुरवात झाल्याबरोबर प्रथम अंतःसृष्टीच्या स्वरूपाबद्दल प्रश्न उद्भवतो. अंतःसृष्टीच्या अस्तित्वाचे स्वरूप काय आणि बाह्यसृष्टीला जसे प्रत्यक्ष अस्तित्व आहे तसे अंतःसृष्टीलाहि आहे की काय अशा प्रकारचे प्रश्न उद्भवतात. या प्रश्नांच्या उत्तराचा शोध आपण करू लागलों ह्मणजे अंतःसृष्टीच्या अस्तित्वाची जाणीव 'मी आहे' एवढ्या भावनेतच असते. सामान्य मनुष्याच्या दृष्टीला ‘मी आहे' एवढ्या जाणिवेपलीकडे अंतःसृष्टीचा शोध लागत नाही. असा शोध लागला व आत्मप्रत्यय येऊन स्वतःच्या ख-या स्वरूपाची ओळख त्याला पटली तर सर्व विश्वाचीहि ओळख त्याला होईल. स्वतःला जाणणे ह्मणजेच विश्वाला जाणणे होय. स्वतःचे ज्ञान झाल्याशिवाय विश्वाचे ज्ञान होणे शक्य नाहीं. * आरंभीं काय होते?' हा प्रश्न आपणास ऋग्वेदांतही आढळतो. या प्रश्नाचे उत्तर वेदान्तानें क्रमशः दिले आहे. आरंभीं आत्मा होता असे वेदान्ताचे उत्तर आहे. याचा अर्थ हाच की ज्याला आपण विश्वात्मा, केवलरूप अथवा परमात्मा या नांवांनी ओळखतों तेच जगाच्या आरंभीं होते. त्याच्यामुळेच सर्व वस्तू दृश्यत्वास आल्या आहेत, येत आहेत व पुढेही येतील.
 ‘आरंभीं काय होते?' या प्रश्नाचे उत्तर देत असतां त्याचवेळी एकंदर नीतितत्त्वांचे मूळ काय या प्रश्नाचे उत्तरही आर्यतत्त्वज्ञांनी देऊन टाकलें आहे. ‘हत्या करू नको; परपीडा करूं नको; चोरी करूं नको; स्वतः इतकेच आपल्या शेजाच्यावरही प्रेम कर' असल्या प्रकारचे नीतिसिद्धांत सर्व धर्मातून जागोजाग आढळतात. पण असे आह्मीं कां करावे, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर मात्र त्यांनी दिलेले नाही. माझ्या शेजा-याला त्रास देण्यांत जर फायदा आहे असे मला वाटत असेल तर तसे मीं कां करू नये?' या प्रश्नाला समाधानकारक आणि विनतोड उत्तर ख्रिस्ती धर्माने दिलेले नाही. जड अथवा बाह्यसृष्टी सोडून अंतःसृष्टांत विहार करणाच्या हिंदूनीच या प्रश्नाचे अत्यंत समर्पक उत्तर दिले आहे. अमुक करावे आणि