पान:विवेकानंद.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]

वेदान्त आणि मानवी संस्कृति.

१३

काली हिंदुस्थानाचा व्यापार आफ्रिकेपर्यंत पोहोंचला होता हेही सिद्ध झालें आहे. ज्यावेळी युरोप खंडाचे कोठे नांवहि ऐकू येत नव्हते, अशा वेळी हिं; लोकांनी आपला संबंध साच्या जगाशी जोडला होत यावरून हिंदु लोक आपला देश सोडून बाहेर कोठेच गेले नव्हते या आक्षेपास जागा उरत नाही. हिंदुस्थानावर ज्या ज्या वेळी परकीयांनी आपला अंमल बसविला त्या त्या वेळी त्या जेत्यांस ऐहिक आणि पारमार्थिक असा दोहों प्रकारचा अलभ्य लाभ झाला आहे हेही लक्ष्यात ठेवण्याजोगे आहे. त्यांस ऐहिक संपत्ति जशी पुष्कळ मिळाली त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मज्ञानांतहि अनुपमेय तत्त्वरत्नांची भर पडली आहे.
 पाश्चात्त्यांच्या बुद्धीचा कल सामान्यतः ऐहिक सुखाकडे अधिक असतो. आपल्याला चैनीच्या वस्तू अधिक कशा मिळविता येतील आणि त्यांचा उपभोग अधिक प्रमाणावर कसा घेता येईल या विचारांत पाश्चात्त्यांचे मन गढलेले असते. हिंदूंची मनोभूमिका याहून निराळ्या प्रकारची आहे. आपल्या गरजा दिवसेंदिवस कमी कशा करता येतील याचा विचार ते करीत असतात.   वेदकालापासून हिंदु लोक ईश्वराच्या शोधांत गुंतले असल्याचे आढळून येते. या शोधांत ते गुंतले असल्याचा पुरावा वेदग्रंथांतहि आढळून येतो. या शोधांत अनेक निरनिराळ्या पाय-यांवरून ते आरूढ होत गेले असल्याचे दिसून येते. पूर्वजपूजा ही त्यांची अगदी पहिली पायरी आहे. यानंतर अग्नि, ॐ आणि वरुण यांची पूजा आढळून येते. वरुणास सर्व देवांत श्रेष्ठ मानले आहे. प्रथम अनेक देवदेवतांची कल्पना प्रचलित होऊन शेवटीं सर्वव्यापी अशा एकाच ईश्वराची कल्पना उरावयाची हा प्रकार आपणांस सर्व धर्माच्या वाडात अवलोकनांत येतो. मनुष्यें समाज करून राहू लागली तेव्हां प्रथम लहान लहान टोळ्या उत्पन्न झाल्या. या टोळ्यांपैकी प्रत्येकीचा परमेश्वर निराळा असावयाचा, आणि तो सर्वशक्तिमान् असावयाचा इतकाच अर्थ एक इश्वर' या शब्दांनीं समजला जात असे. हा ईश्वर जगाचा उत्पन्नकर्ता नियता व सर्वसाक्षी आहे असा समज असे. अशा रीतीने अनेक देवदेवतांची कल्पना संपुष्टांत येत येत एकेश्वराची कल्पना रूढ झाली; तथापि या एकेश्वराच्या कल्पनेने हिंदूंचे मात्र समाधान झाले नाही. या कल्पनेने अगदी सामान्य मानवीबुद्धीचे मात्र समाधान होण्याजोगे आहे; पण केवळ ईश्वराच्या