पान:विवेकानंद.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


रोजच्या धर्मविधींतही या शास्त्रांतील कित्येक प्रक्रियांचा अंतर्भाव झालेला आहे.
 हें सारें अचाट सामर्थ्य मानवी मनांतच वास करीत आहे, असा या शास्त्राचा मूलसिद्धांत आहे. मनुष्यांत व्यक्तरूपाला आलेले मन, हेवि श्वव्यापी मनाचा अंश आहे. प्रत्येक मनुष्याचे मन एकाच मनांतून उद्भूत झालेले असल्यामुळे, एका मनाचा दुस-या मनाशी नित्यसंबंध आहे. तसेच एखादें मन जगाच्या कोणत्याही कोंपन्यांत राहत असले, तरी त्याचा संबंध सर्व जगाशी कायम असतो.
 विचारसंक्रमणाचा एखादा चमत्कार तुमच्या अवलोकनांत कधी आला आहे काय ? एखादा मनुष्य या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा विचार करीत असला, तर दुस-या एखाद्या ठिकाणी असलेल्या मनुष्याच्या मनांत बरोबर तोच विचार प्रवेश करतो. ही गोष्ट कांहीं काकतालीयन्यायाने घडते असे नाही. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. आपल्या मनातील विचारांची प्रेरणा दुस-याच्या मनांत करण्याचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास दोन प्रकारचा असतो. दुस-याच्या मनांत आपल्या मनातील विचार प्रेरावयाचा आणि दुस-याच्या मनांतील विचाराचे ग्रहण करावयाचे. प्रेरकाने एका बाजूने कांहीं विचाराची प्रेरणा केली, की दुसरीकडे ग्राहकही तयार राहतो आणि त्या अतिथीचे स्वागत करतो. प्रेरकाकडून निघालेला विचार, ग्राहकाच्या मनांत जशाचातसाच शिरतो. अंतर कितीही मोठे अथवा लहान असले, तरी विचारसंक्रमणाच्या क्रियेंत त्यामुळे कांहीं अडथळा होत नाही. प्रेरकाकडून विचार निघाला, की तो ग्राहकाच्या चित्तांत प्रवेश करतो आणि ग्राहकालाही बरोबर त्याचे ज्ञान होते. जर माझे मन अथवा तुमचे मन ही प्रत्येक निराळी असती -जर प्रत्येक मन अभेद्य तटाने दुस-या मनापासून अगदी विभक्त झालेले असतेंतर एका मनांतील विचारांचा प्रवेश दुस-या मनांत कधीही झाला नसता. मी आतां भाषण करीत आहे आणि आपण ते ऐकत आहां. या क्रियेतही विचारसंक्रमण होत आहे. या क्रियेचे शास्त्रीयस्वरूप काय आहे ते पाहूं. या क्रियेंत माझे विचार जसेच्यातसेच आपल्या मनांत प्रवेश करीत नाहींत. माझ्या मनांतला विचार तोंडावाटे बाहेर निघाला, की बाहेरील आकाशतत्त्वांत ( Ether ) विरून स्पंदरूप होतो. ते स्पंद आपल्या कर्णद्वारे आपल्या मदें.