पान:विवेकानंद.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


अंगावर राहूं दिले. त्या दिवशीं थंडी फार होती म्हणून पांघरावयास एक ब्लांकेट त्यानें मजपासून मागून घेतलें; आणि तें पांघरून तो खोलीच्या एका कोपन्यांत जाऊन बसला. त्या खोलींत त्यावेळी सुमारें पंचवीस माणसें होतीं. तो गृहस्थ म्हणाला, 'बोला, तुम्हांला काय काय पाहिजे तें.' आम्ही सर्वांनी कांहीं फळांची नांवें लिहिली. त्यांत कित्येक फळे जवळपासच्या प्रदेशांत न मिळणारी अशीही होती. फळांच्या यादींत द्राक्षे, नारिंगें इत्यादि अनेक प्रकारची फळें होती. नंतर आम्ही ते तुकडे त्याजपाशीं दिले. थोड्या वेळानें ब्लांकेटाखालून फळे बाहेर येण्यास सुरवात झाली. द्राक्षांचे घडचे घड आणि नारिंगें वगैरे इतर फळें भराभर बाहेर पडूं लागलीं. शेवटीं इतकीं फळे बाहेर पडली, की त्या सर्वांचें वजन केलें असतें तर तें त्या मनुष्याच्या वजनाच्या दुप्पट झालें असतें. ती फळे त्यानें आम्हास खावयास दिली; परंतु कित्येकांनी तीं खाण्याचें नाकारलें. त्यांत कांहीं जादू असेल असे ते म्हणूं लागले; पण तो गृहस्थ जेव्हां तीं फळे स्वतःच खाऊं लागला तेव्हां बाकीच्या सर्वांनी त्यांजवर खुशाल ताव मारला. त्यापासून कोणाला कांहीं इजा वगैरे पोहोंचली नाहीं.
 शेवटी त्यानें कांहीं सुंदर गुलाबाची फुले काढलीं. प्रत्येक फूल अगदीं पुर्ण फुललेले असून नुकतेंच तोडल्यासारखें दिसत होतें. त्यावरील दवांचे बिंदूही जसेच्यातसे असून सर्व पाकळ्या अगदी ताज्या दिसत होत्या. एखादी पाकळी सुद्धां गळलेली नव्हती अगर चुरून खराबसुद्धां झाली नव्हती. ती फुलेंही कांहीं थोडीं थोडकीं नव्हतीं. भाराभर फुलें त्यानें आलीं होतीं. तो जावयास निघाला त्यावेळी ' हे तुझीं कसें केलें' असा प्रश्न मी त्याला केला; तेव्हां तो हंसून म्हणाला, 'ही सर्व हातचलाखी आहे. दुसरें कांहीं नाहीं.' त्याची विद्या कोणतीही असो; पण ती हातचलाखी मात्र खास नव्हे. हात. चलाखीनें कांहीं इतकीं फळे आणि फुलें येणें शक्यच नव्हतें.
अशाच प्रकारच्या दुसऱ्याही अनेक गोष्टी माझ्या प्रत्यक्ष अवलोकनांत आल्या आहेत. हिंदुस्थानांत कांहीं काळ तुम्ही फिरलां तर असल्या शेकडों गोष्टी तुमच्या पाहण्यांत येतील. मला वाटतें, प्रत्येक देशांत असल्या प्रका रच्या गोष्टी घडत असतील. तुमच्या या देशांतही ( अमेरिकेत ) असल्या चमत्काराच्या गोष्टी घडत असतील. आतां या गोष्टी घडतात हें खरें असलें, तरी त्यांत गप्पाही पुष्कळ असतात, हें कबूल केले पाहिजे; पण एक गोष्ट