पान:विवेकानंद.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
मानवी मनाचें सामर्थ्य.

२२५


खिशांतला कागद काढा." मीं कागद काढून पाहिला तो तेंच वाक्य त्या काग- दावर लिहिलेलें मला आढळले ! तो कागद त्यानें सुमारें एक तासापूर्वी लिहिला होता; आणि त्यांत त्यानें एक वाक्य असेंही लिहिले होतें कीं 'हे गृहस्थ पुढील वाक्य मनांत धरतील.' नंतर माझ्या एका स्नेह्याकडे वळून तो म्हणाला, 'तुम्हीही एखादें वाक्य मनांत धरा. माझ्या स्नेह्याला आरबी भाषेचें चांगले ज्ञान होतें. त्याने कुराणांतील एक वाक्य मनांत धरले. त्या मनुष्याला आरबी भाषेचा गंधही असण्याचा संभव नव्हता. माझ्या स्नेह्यानें आपल्या खिशांतील पाकीट उघडून पाहतां, त्यालाही तेंच वाक्य बरोबर लिहिले अस ल्याचें आढळून आलें. आमच्यापैकीं तिसरे एक गृहस्थ डॉक्टर होते. त्यांनी एका जर्मन वैद्यकीय ग्रंथांतले एक वाक्य मनांत धरलें; आणि तेंही अशाच रीतीनें कागदावर आगाऊ लिहिलेले आढळले.
 या सर्व गोष्टींचा मला मोठा चमत्कार वाटला; आणि त्या गृहस्थानें कांहीं विलक्षण रीतीनें आम्हांस चकविलें तर नसेलना ! अशी शंका माझ्या मनांत येऊं लागली. थोड्या दिवसांनी आणखी कांहीं स्नेही बरोबर घेऊन मी त्याज- कडे पुन्हा गेलों आणि या वेळींही सारे प्रकार पूर्ववत् अगदी बरोबर घडून आले.
 दुसऱ्या एका प्रसंगी कांहीं कामानिमित्त मी हैद्राबादेस गेलों होतों. तेथें माझ्या ऐकण्यांत आले कीं, एक गृहस्थ हजारों प्रकारचे जिन्नस बसल्या जागी काढून दाखवितो. हा गृहस्थ हैद्राबाद येथें कांहीं व्यापारधंदा करून राहत असे. आम्ही त्या गृहस्थाकडे गेलों आणि कांहीं जिन्नस काढून दाखविण्या- विषयीं त्यास विनंति केली. त्या दिवशीं तो गृहस्थ तापानें आजारी होता. एखाद्या सत्पुरुषानें स्पर्श केला असतां रोगग्रस्त मनुष्यांचा रोग जातो असा आम्हा हिंदूंचा विश्वास आहे. त्याला अनुसरून सदई गृहस्थ मला म्हणाला, 'महाराज, माझ्या मस्तकावर जरा आपला हात ठेवा बरें.' मी त्याला म्हटले, 'पण तुम्ही मला आपली करामत दाखविली पाहिजे.' ही गोष्ट त्यानें कबूल केल्यावर त्याच्या इच्छेप्रमाणें मी आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवला. पुढें कबूल केल्याप्रमाणें थोडया दिवसांनीं तो मजकडे आला. त्यावेळीं तो फक्त एक धोतर नेसला होता, व अंगावर थोडे कपडे होते. आम्ही त्याच्या आंगा- वरील सर्व कपडे काढून बाजूला ठेवले. त्याचें नेसतें धोतर मात्र त्याच्या
 स्वा. वि. सं. ३-१५