पान:विवेकानंद.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीत

मानवी मनाचें सामर्थ्य.


 आपण साऱ्या जगाचा इतिहास अवलोकन केला, तर अलौकिक गोष्टी घड- तात अशी पुष्कळांची श्रद्धा असते असें आपणांस आढळून येईल. ही गोष्ट कोणत्याही एका विशिष्ट काळालाच लागू होती असें नाहीं. प्राचीनकाळापासून तो आजतागाईत अशा प्रकारचा विश्वास बाळगणारे लोक सर्वत्र होते व आहेत. विचित्र गोष्टी घडल्याचें ज्याच्या कानावरूनही गेलें नाहीं असा मनुष्य बहुधा सांपडावयाचा नाहीं; आणि आपणांपैकीं पुष्कळांना अशा चमत्कारांचा प्रत्यक्ष अनुभवही आला असेल; पण इतर लोकांच्या अनुभवाविषयीं सांगत बसण्यापेक्षां मला स्वतःलाच जे कांहीं अनुभव आले, आणि ज्या कांहीं गोष्टी मीं स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिल्या, त्याच आरंभी तुह्मांस सांगाव्या हें वरें.. झणजे आपल्या आजच्या विषयाला ही प्रस्तावनाही खाशी होईल.
 एके वेळी एका मनुष्याबद्दल माझ्या कानांवर असें आलें कीं, कोणी त्याकडे मनांत कांहीं प्रश्न धरून गेला, तर तो त्यांची उत्तरें ताबडतोब देतो. तसेंच पुढे होणाऱ्या कांही गोष्टीही तो सांगतो. हें वर्तमान ऐकून त्या मनुष्याला पाहण्याची इच्छा मला झाली. कांहीं मित्रांबरोबर मी त्याजकडे गेलो. आमच्या पैकीं प्रत्येक जणाच्या मनांत कांहीं ना कांहीं विचारावयाचें होतें. आह्मांस जे प्रश्न त्याला विचारावयाचे होते, ते कागदांवर लिहून ते कागद आम्ही पाकिटांत घातले होते. आमच्यापैकी एकाकडे पाहिल्याबरोबर तो आमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरें सांगू लागला. मग त्याने एका कागदावर कांहीं मज- कूर लिहून तो कागद एका पाकिटांत घालून तें बंद केलें; आणि तें पाकिट माझ्यापुढे करून म्हणाला, ‘यांत तुमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरें आहेत. हे आपल्या खिशांत घाला.' अशा रीतीनें त्यानें प्रत्येकाला त्याचे प्रश्न आणि त्यांची उत्तरें दिलीं. नंतर त्याने आम्हांस कांहीं पुढें घडून येणाऱ्या गोष्टीही सांगितल्या. थोड्या वेळानंतर तो ह्मणाला, “कोणत्याही भाषेतला एखादा शब्द अथवा एखादें वाक्य आपल्या मनांत धरा. त्याला संस्कृत भाषेचें ज्ञान मुळींच नव्हतें हैं मला ठाऊक होतें; ह्मणून एका संस्कृत ग्रंथांतील एक लांब- लचक वाक्य मीं मनांत म्हटले. नंतर तो मला म्हणाला, " आतां आपल्या