पान:विवेकानंद.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२२३


करूं नका. स्वतःचीं साधनें जय्यत करण्याची खटपट मात्र अवश्य करावी; झणजे साध्य असेल तें आपोआप सिद्ध होईल. आपण आपले वर्तन पवित्र केलें आणि आपलें चारित्र्य सुधारलें, तर जग आपोआपच सुधारेल. जग सुधारण्याची साधनें, आपण मनुष्येच आहोत. याकरितां स्वतःच पवित्र होण्याच्या मार्गाला लागा. तुम्ही स्वतः पूर्णत्व पावलां म्हणजे जग पूर्ण होईल.