पान:विवेकानंद.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




वेदान्त आणि मानवी संस्कृति.


 सांप्रतचें हिंदी राष्ट्र ह्मणजे जित आणि दुःखीकष्टी लोकांचा एक समुदाय आहे, असे जड बुद्धीच्या लोकांस वाटते. जगाच्या केवळ बाह्य देखाव्याकड़े पाहूनच त्याजविषयांच्या केलेल्या अनुमानांत चूक व्हावी यांत नवल नाहीं. हिंदी राष्ट्र ह्मणजे केवळ स्वप्नसृष्टीत भ्रमण करणाच्या तत्त्ववेत्त्यांचे राष्ट्र आहे असे या लोकांचे मत आहे. केवळ ऐहिकदृष्ट्या पाहिले असतां हिंदी लोक जित आहेत हे खरे; तथापि धर्मज्ञानदृष्ट्या ते साच्या जगाचे जेते आहेत हे या लोकांच्या लक्ष्यांत येत नाही. आता दुस-या एका दृष्टीने विचार करता पाश्चात्त्यांस आणि पौर्वात्त्यांस एकमेकांच्या सहवासाचा फायदा करून घेतां येण्यासारखा आहे. पाश्चात्त्यांत रजोगुणाचे आधिक्य असल्यामुळे त्यांच्यांत चापल्य आणि उद्यमशीलता हीं अधिक आहेत. या गुणांस पौर्वात्यांच्या विचारशीलतेची आणि अंतर्मुखतेची जोड मिळाली तर त्यांत त्यांचे हितच आहे. त्याचप्रमाणे पाश्चात्त्यांच्या रजोगुणाचा संसर्ग पौवात्त्यांसही हितावहच होईल. आतां हा विचार बाजूला ठेवला तरीहि आणखी एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो. जित आणि दुःखीकष्टी अशी हिंदी आणि यहुदी यांची राष्ट्रे कालचक्राच्या एवढ्या भयंकर वावटळींत अद्यापिहि टिकून राहिली कशी ? हिंदी राष्ट्राच्या जन्मानंतर कित्येक राष्ट्रे ऊर्जितदशेस येऊन धुळीसही मिळून गेली. त्यांच्या नांवापलीकडे त्यांच्या अस्तित्वाचा आता मागमूसही लागत नाहीं. अशी स्थित्यंतरे होत असतां हिंदी राष्ट्राने आपले अस्तित्व आजपर्यंत कायम राखिलें तें कशाच्या बळावर याचाही विचार करावयास नको काय? हिंदु लोक आज अगदीं निःशब्द आहेत हे खरे; पण ते अद्यापि अस्तित्वांत आहेत; आणि सांप्रतकाळीं यहुदी लोकांची संख्या पूर्वीच्या पालेस्टाइनमधील संख्येहूनहि अधिक आहे. हिंदु आणि यहुदी या लोकांच्या जिवटपणाचें कारण त्यांचे धार्मिक जीवन हेच होय.<be>  हिंदुतत्त्वज्ञानाचा प्रसार साच्या जगभर झाला आहे. देशकालानुरूप त्याच्या स्वरूपांत फरक पडला आहे ही गोष्ट खरी; तथापि सा-या जगांतील लोकांच्या आंगांत ते मुरून गेलेलें आहे हेही खरे आहे. त्याचप्रमाणे पूर्व