पान:विवेकानंद.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२१९


टाकण्यास समर्थ असते. एखादे वेळीं कांहीं गोष्टींचा परिणाम असा होतो की सुतकीपणा आपल्या वृत्तीत शिरून बसतो. जगांत खरें प्रेम, खरा निःस्वार्थी- पणा इत्यादि सद्गुणांचा वास कोठेंही नाहीं असे वाटू लागून आपली वृत्ति अत्यंत निरुत्साही बनून जाते. पूर्ववयांत उदार, क्षमावान्, सदय आणि सरळ मनाचीं असलेली पुष्कळ माणसें वृद्धपणीं आपली माणुसकीसुद्धां विस- रलीं असल्याचे आढळून येतें. यांत कित्येक ढोंगी असतात हें कांहीं खो नाहीं; पण पुष्कळांची मनुष्यत्वाची जाणीवच नष्ट झालेली असते. एखाद्या वाईट कृत्यांचा रागही त्यांस येत नाहीं अथवा कशाबद्दल प्रेमही त्यांच्या चित्तांत असत नाही. त्यांचें मनुष्यत्व त्यांच्या बाह्य आकारांत मात्र राहि- लेलें असतें. ते कोणावर कधी रागावत नाहींत याचें कारण, त्यांस खरी शांति प्राप्त झाली असते हैं नव्हे, तर त्यांचें रागावण्याचे सामर्थ्यच नष्ट झालेलें असते. यामुळे एखाद्या वाईट कृत्याबद्दल कोणाला ते बांकडा शब्दही बोला. वयाचे नाहीत. यापेक्षां राग येणें शतपट अधिक चांगले. त्यामुळें खरें मनु- ष्यत्वतरी जागे होईल; पण त्यांच्या ठिकाणचें मनुष्यपण निद्रावस्थेत नसतें, तें मेलेलें असतें. त्यांच्या नजरेसमोर कांहीं दुष्कृत्यें घडलीं, तरी त्यांबद्दल त्यांस क्षिति वाटत नाही. एखाद्याला शिव्याशाप देण्याइतकें मनुष्यपणही तेथें जिवंत नसतें. अशीं मनुष्य म्हणजे निवळ चालतेवोलते दगडी पुतळे ! .
 हा प्रकारही अत्यंत त्याज्य आहे, हे उघडच आहे. यावरून आपणांस किती प्रकारच्या अडचणींतून मार्ग काढावयाचा आहे याचा अजमास होण्या- जोगा आहे. याचकरितां आपणांस ईश्वराच्या बळाहूनही अधिक बळाची अपेक्षा आहे असें मीं नुकतेंच म्हटलें होतें. सामान्य मनुष्याच्या बळानें आपला मार्ग आपणांस आक्रमण करता येणार नाहींच, पण त्याहून बळानेसुद्धां हें काम होणार नाहीं. ईश्वरी बळाहून अधिक बळच हें कर्म जाणेल. या चक्रव्यूहांतून बाहेर पडण्यास ईश्वरी बळाहूनही अधिक बळ अंगीं पाहिजे. आपल्या जीवनारण्यांत अनेक जाळी, अनेक गुंतागुती आहेत. त्यांतील अनेक विषारी सर्पाच्या आणि क्रूर श्वापदांच्या गर्दीतून आपणांस सुरक्षितपणें बाहेर पडावयाचें आहे. यांत आपल्या शरिराला इजा झाली, हातपाय मोडले आणि आपण रक्तबंबाळ झालों, तरी आपलें हृदय दिवसें- दिवस अधिक दृढ होत गेले पाहिजे. कितीही आघात झाले, तरी मनाच्या शक्ती क्षीण न होतां वाढत गेल्या पाहिजेत.