पान:विवेकानंद.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


आपणांस शेंकडा नव्याण्णव प्रसंगी अर्से आढळून येईल की, साधनांकडे आपलें दुर्लक्ष्य झाल्यामुळे कार्य फसलें. प्रत्येक साधन नीट तपासणे, त्याची दुरुस्ती करणें आणि तें कार्यक्षम करणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. साधनें जय्यत असली तर यश ठेवलेलेंच. कारणापासून कार्य निर्माण होतें-कारणाचें कार्य होतें- हा सिद्धांत शेंकडों वेळां आपल्या कानांवरून गेलेला असेल; पण प्रत्यक्ष कार्याच्या वेळी आपणांस त्याचा जणुं काय विसर पडतो. कार्य कांहीं आपण होऊन बनत नाहीं; साधनांनीं तें बनवावयाचें असतें. याकरितां कारण- रूप पदार्थ योग्य असतील, आणि कार्यक्षम स्थितीत असतील, तरच कार्याचा परिपाक बरोबर उतरेल. उलटपक्षी कार्याचें मातेरें होईल हे उघड आहे. आपलें साध्य काय आहे, हें एकवार ठरविलें आणि योग्य साधनांची तरतूद लावली कीं साध्य विसरावयाससुद्धां हरकत नाहीं. मग साधनांकडे लक्ष्य ठेवून त्यांना पूर्णता कशी येईल इतकेंच पाहिले तरी साध्य हटकून सिद्ध होई लच. कारणरूप पदार्थांची योग्य संघटना झाली की कार्य हें होणारच. त्याला निराळें बोलावणे पाठविण्याचे कारण नाहीं. साधनांची योग्य काळजी घेणें हें आपले पहिले महत्त्वाचे कर्तव्य आहे. ते नीट बजावलें गेलें कीं सिद्धीकडे ढुंकून पाहण्याचीसुद्धां गरज नाहीं. ती आपण होऊन चालत येईल. आपले साध्य हें कार्यरूप असून साधनें हीं कारणरूप आहेत. याकरितां कारणरूपा- कडे प्रथम लक्ष्य देणे आणि त्याविषयींच शक्य तितका बारीक विचार करणें हैं आपल्या जीवनक्रमांतील एक महत्वाचें रहस्य आहे. कर्माविषयीं भगव- द्गीतेंत केलेले विवेचन पुष्कळांनी वाचलें असेल. आपणांस सतत कार्यरत राहणें अवश्य आहे, असें गीतेचें सांगणें आहे. कर्म केल्यावांचून आपल्या आयुष्यांतील एक क्षणही जात नाहीं. हैं खरें असेल आहेच तर आपले सारें लक्ष्य हाती घेतलेल्या कार्याकडे लावा. आपले कार्य मोठे असो अथवा क्षुल्लक असो. आपलें मन फक्त त्या एकाच कार्यात गुंतून राहिले पाहिजे. दुसऱ्या कसल्याही बाबी उपस्थित झाल्या तरी त्यांनी आपले लक्ष्य त्या कार्या- तून खेचून घेऊं नये, इतकें आपले लक्ष्य त्या एकाच कार्यात गुंतलेले असावें, तथापि अर्से असले तरी त्याचा त्याग कोणत्याही क्षणी करण्याची चित्ताची तयारी असली पाहिजे. कोणतेही कार्य मनःपूर्वक करावयाचें, पण त्याच्या फळाबद्दल अनासक्त असावयाचें असें गीतेचें सांगणें आहे. “ तस्मादसतं