पान:विवेकानंद.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
कर्मरहस्य.

२०९


कर्मरहस्य.


 कर्म कसे करावें यासंबंधी जे कांहीं मोठे धडे मी आपल्या आयुष्यांत शिकलों, त्यांतला एक विशेष महत्त्वाचा आहे. तो असा कीं, कर्माच्या अंतिमपर्य- वसानाकडे जितकें लक्ष्य आपण लावतों, तितकेंच साधनांच्या बाबतींतही लक्ष्य देणें अवश्य आहे. ज्यांच्यापासून हा धडा मला मिळाला ते फारच थोर पुरुष होते. त्यांचा सारा जीवनक्रम या तत्त्वाला धरून चालत असे. या तत्त्वाचें प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप कसें असतें असा प्रश्न कोणीं विचारला, तर नमुन्यादाखल त्या थोर गृहस्थांच्या वर्तनक्रमाकडे खुशाल बोट दाखवावें ! या एकाच तत्त्वांतून दुसन्याही अनेक महत्त्वाच्या बाबी निर्माण होतात असें माझ्या अनुभवाला आले आहे. कोणत्याही कार्यातील यशापयश या तत्त्वावर मुख्यत्वेंकरून अवलंबून असतें असा माझा समज आहे. कर्माचें साध्य आणि त्याकरितां हातीं घेतलेलीं साधनें या दोन्ही बाबींकडे सारखें लक्ष्य पुरविलें तरच साध्य सिद्ध होईल.< br>  आपल्या एकंदर जीवनक्रमाचें सूक्ष्मदृष्टया निरीक्षण केले तर असें आढ- ळून येतें कीं, आपले लक्ष्य साध्याकडे-कर्माच्या पर्यवसानाकडे - जितकें वेध- लेलें असतें, तितकें तें साधनांकडे असत नाहीं. एखादें कार्य करावें असा विचार आपल्या मनांत आला ह्मणजे त्या कार्यरूप इमारतीचा साद्यंत नकाशा आपल्या मनचक्षूंपुढे दिसूं लागतो; आणि आपले लक्ष्य कळसाकडे अगोदर वेधलें जातें. आपण अमुक कार्य केलें तर त्याचें अमुक रीतीनें पर्यवसान होईल असा विचार मनांत आला, ह्मणजे तें पर्यवसान जणुंकाय झालेच आहे अशा रीतीनें आपल्यापुढे उभें रहातें. त्याच्या मनोहर रूपाकडे आपलें सारें चित्त लागतें. आपल्या चित्ताला त्यामुळे मोह उत्पन्न होतो. आपल्या मनो- भूमिकेवर त्याचेंच चित्र विशेष स्पष्ट रंगांत खुलतें आणि त्यामुळे त्या साध्याच्या साधनांकडे साहजिकच आपले दुर्लक्ष्य होतें.
आपण आपल्या आयुष्यांत अनेक प्रकारची कार्ये हाती घेत असतो आणि  अनेक कार्यात आपणांस अपयश आलेलें असतें. अशाचपैकी एखाद्या कार्याचा आपण मनःपूर्वक अभ्यास केला आणि त्याचें तपशीलवार पृथक्करण केलें तर
 स्वा. वि. खं. ३-१४