पान:विवेकानंद.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण ७ वें.

२०७


 हें ज्ञान प्राप्त करून घेऊन विश्वाशी एकरूप होऊन जाणें हें अद्वैतमताचें साध्य आहे. जो विश्वाशी एकरूप होतो त्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे स्वर्गादि लोक आणि ब्रह्मलोकही नष्ट होतात. हे लोकही स्वप्नांतलेच आहेत. स्वप्न संपलें ह्मणजे त्यांतील वस्तूंना अस्तित्व कोठून राहील? ज्यांचे स्वप्न संपलें ते परमात्मरूपच होतात. या क्षुद्र देहांतून ते बाहेर पडतात आणि आपल्या खऱ्या रूपाला ते परत जातात. आज या क्षुद्र देहाचें आपण अतिशय कौतुक करतों; पण हें स्वप्न संपलें ह्मणजे आपलें खरें महत्त्व आपणांस प्राप्त होईल. 'पण अनंतत्वांत आमचें व्यक्तित्व हरवणार नाहीं ना ?" स्वप्नांतला "मी" जागा झाला म्हणजे तो हरवला असे म्हणतां काय ? त्याचप्रमाणे जगन्द्र- माचा निरास झाला म्हणजे तुमचें अनंतत्व - खरें रूप तुम्हांस प्राप्त होईल. असे झाले म्हणजे क्षुद्र वस्तूंबद्दल आज वाटणारें प्रेमही नष्ट होईल, यांत नवल नाहीं. आपल्याला या एकाच लहानशा देहांत केवढा आनंद अनुभवास येतो ! मग आपला देह विश्वरूप झाला अत्यंत विस्तार पावला तर त्यांत केवढ्या आनंदाचा प्रत्यय येईल, याची कल्पना होत असेल तर करा. ज्या मनुष्याला हा अनुभव येतो, तो मुक्त होतो. तो स्वप्नांतून जागा होऊन आपल्या मूलरूपास जातो. अद्वैतमताचें हें निरूपण आहे.
 वेदान्तमताच्या तीन पायऱ्या आहेत. अद्वैतमत ही अखेरची पायरी आहे. तो शेवटचा मुक्काम आहे. त्यापलीकडे जाणे शक्यच नाहीं. कारण मूलरूपा- पलीकडे जाणे शक्य नाहीं. कोणतेंही शास्त्र मूलरूपापर्यंत पोहोंचलें म्हणजे तें पूर्णावस्थेस गेलें असेंच म्हटले पाहिजे. त्यापलीकडे तें कोठें जाणार ? केवल- रूपापलीकडे जाणें तुम्हांस शक्यच नाहीं. ज्या एकरूपांत हें सारें विश्व उत्क्रांत झाले आहे, तें केवलरूप आहे. हा अद्वैतसिद्धांत सर्वांनाच मानवतो असें नाहीं. हा नुसता समजणेंही फार कठीण आहे. त्याचें ग्रहण बुद्धीनेंही करणें अवघड आहे. अत्यंत कुशाग्रबुद्धि आणि निधडी छाती यांनाच तो समजला तर समजेल. बहुजनसमाजाला या सिद्धांताचा फारसा उपयोग होत नाहीं.
 पहिल्या पायरीपासून आरंभ करून क्रमाक्रमानें पुढील मार्गाला लागावें हें उचित आहे. त्या पायरीवर पाऊल पर्के ठरलें, म्हणजे दुसऱ्या पायरीवर पाय ठेवण्यास अवसान सांपडतें आणि त्यामुळे दुसरी पायरी चढण्यास सोपी जाते. एखाद्या मानवकुलाचा अभ्युदय आणि एखाद्या व्यक्तीचा अभ्युदय यांचे मार्ग