पान:विवेकानंद.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


जन्म घेतो. पण ज्याला ब्रह्मलोकाची प्राप्ति झाली असेल, असा जीव मात्र त्या लोकाचा अनंतकालचा रहिवासी होतो. हीं अत्युच्च प्रतीची माणसें होत. स्वार्थ पूर्णपणे विसरलेलीं, अत्यंत पवित्र, आणि ज्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा नाहींशा झाल्या आहेत, अशी असून परमेश्वराचें पूजन व भक्ति करावयाची इतकेंच त्यांस कर्तव्य उरतें. यांच्या खालच्या पायरीचे लोक ह्मणजे शुभक करणारे, परंतु फलाशा असलेले असे होत. त्यांना स्वर्गभोगांची इच्छा असते. ते मृत झाले ह्मणजे चंद्रलोकास जातात. त्या ठिकाणी त्यांस देवांचा देह मिळतो. देवयोनी ह्मणजे अमरांची योनी नव्हे. त्यांनाही मरण आहेच. स्वर्गातल्या रहिवा- शांनाही मृत्यूनें सोडलेलें नाहीं. ब्रह्मलोकांतील रहिवाशांस मात्र मृत्यु स्पर्श करूं शकत नाहीं. त्याठिकाणीं मात्र जन्ममृत्यूंचें वारेंही नाहीं. देव आणि दानव यांचीं वारंवार युद्धे होत असत असें वर्णन आमच्या पुराणांत केलेले आढळते. अशाप्रकारची वर्णनें जगांतील सर्व प्रकारच्या दंतकथांतून आढळतात. त्याच प्रमाणें मानवी स्त्रियांस देव भुलल्याचीं वर्णनेंही आढळतात. देवयोनींत नवें कर्म जीवाच्या हातून घडत नाहीं. तेथें फक्त पूर्वकर्माचें शुभ फळ भोगाव- याचें असतें. कर्म ह्मणजे ज्यापासून सुखदुःखादिकांची उत्पत्ति होते तें. एखादा मनुष्य मरून देवलोकों गेला ह्मणजे तेथें असेपर्यंत तो स्वर्गसुख भोगतो. पण शुभकर्मे भोगून झाल्यावर वाकीची कमें उदय पावूं लागतात.
 वेदग्रंथांत नरकांचें वर्णन आढळत नाहीं. पण पुराणग्रंथांनी अनेक प्रकारचे नरक निर्माण करून ठेवले आहेत. त्या स्थितीत वाईट करें फलद्रूप होत असतात. त्यानंतर तो जीव मृत्युलोकांत पुन्हां जन्म घेतो आणि कर्मे कर •ण्याची संधी त्यास पुन्हा प्राप्त होते. मानव देह हा मोठ्या योग्यतेचा आहे. मानवयोनी ही कर्मयोनी आहे. आपण जणुंकाय चक्राकार परिभ्रमण करीत असतां ही मध्यंतरींची विश्रांतिची जागा आहे ! तसेंच येथें तुम्हांस आपल्या पुढील स्थितीची तयारी करावयाची संधी मिळते. यामुळे मानवयोनी ही देवयोनीपेक्षां मोठी मानिली आहे. याप्रमाणें द्वैतमतानें सांगितले आहे.
 यानंतर वेदान्ताची पुढील पायरी लागते. द्वैतकल्पना असंशोधित आहेत, ही कल्पना प्रथम येथे उद्भवल्याचे आढळून येतें. जर परमात्मा अनंत, जीवात्मा अनंत आणि प्रकृतिही अनंत असें ह्मटले, तर दुसरेही अनेक पदार्थ अनंत होऊं शकतील. हे ह्मणणे तर्कशास्त्राला प्रतिकूल आहे. परमेश्वर हा