पान:विवेकानंद.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


देह याचा नि:पात तितक्या लवकर होत नाहीं, हे आपल्या लक्ष्यांत आले असेल. सूक्ष्मदेहाच्या आंत जीवाचा वास असतो. वेदान्तमताप्रमाणें जीव हा परमात्म्याप्रमाणेच अनाद्यनंत आहे. तसेंच प्रकृतिही आनाद्यनंत आहे, तथापि ती रूपांतरक्षम आहे. ती वारंवार बदलते. आकाश आणि प्राण हीं तत्त्वें अनाद्यनंत आहेत, पण त्यांच्या रूपांत क्षणोंक्षणीं वद्दल होत असतो. त्याचप्रमाणे जडवस्तू आणि जडशक्ति हीं सुद्धां अनाद्यनंत आहेत, पण त्यांच्या रूपांतही प्रत्येक क्षणीं बदल सुरू आहे. जीव हा कोणत्याही प्रकारच्या वस्तुसंघातामुळे बनलेला नाहीं; त्यांत प्राण अथवा आकाश यांपैकी कोणाचाही भाग नाहीं. तो मिश्रणरूप नसल्यामुळे त्याच्यांत बद्दल होत नाहीं आणि तो अनाद्यनंतही आहे. जें जें कांहीं प्राण आणि आकाश यांच्या संयोगानें उत्पन्न झालें असेल, तें रूपांतरक्षम असलेच पाहिजे; आणि जें मिश्रणरूप नसेल त्यांत रूपांतर होणें शक्यच नाही. त्याचप्रमाणे त्याचा नाश होणेही शक्य नाहीं. कारण नाश या शब्दाची शास्त्रीय व्याख्या ह्मटली म्हणजे कार्यरूपांतून कारणरूपांत रूपांतर होणें, इतकीच आहे. जें मिश्ररूप नाहीं तें अविनाशी असलेच पाहिजे. स्थूल देह हा आकाश आणि प्राण यांच्या मिश्रणानें आणि प्रतिमिश्रणानें बनला असल्यामुळे त्यांत विघटना व्हावी हे नैसर्गिकच आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्मदेहही कालांतरानें नाश पांवेल. परंतु जीव कार्यरूप नस- ल्यामुळें तो सर्वथैव अविनाशी आहे. ह्याचसाठी जीव अमुक वेळी जन्माला आला असें ह्मणणें अशास्त्र - चुकीचे आहे. जे मूलरूप आहे तें नवीन जन्मास येणें शक्य नाहीं. जें मिश्ररूप असेल - दोन पदार्थांच्या संयोगानें झालें असेल- तेंच जन्मास येऊं शकेल. लक्षावधि आकारांनीं भरलेली ही सारी प्रकृति पर- मेश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. परमेश्वर सर्वव्यापी, सर्वातरात्मा आणि निराकार असा असून तो सर्वत्र आहे आणि सर्व काली प्रकृतीच्या घडामो- डीचें अधिष्ठान आहे. ही सर्व प्रकृति त्याच्या नियामकत्वाखाली आपले खेळ करीत आहे. या प्रकृतीच्या राज्यांतील एकाही प्राण्याला स्वातंत्र्य नाहीं, असें असणें शक्यच नाहीं. तोच सर्वांचा अधिपति आहे. हे द्वैतमताचें सामान्य निरीक्षण झालें.
 आतां यावर असा प्रश्न उद्भवतो कीं जर परमेश्वरानें या सृष्टीला निर्माण केलें तर ती इतकी दुष्ट कशी झाली ? आम्ही सर्व ज्या हजारों प्रकारच्या