पान:विवेकानंद.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ७ वें.

२०१


आकाश हें जडवस्तूंचें मूलरूप आहे. दुसऱ्या पदार्थाला त्यांनी प्राण असे नांव दिले आहे. जे कांहीं आपण पाहू शकतों अथवा ऐकूं शकतों अथवा ज्याचा आपणांस कोणत्या तरी द्वाराने अनुभव घडतो, तें सर्व जडरूप आहे. आणि प्रत्येक वस्तूला तिचें जडरूप आकाशापासून प्राप्त झाले आहे; अथवा आकाशच निरनिराळी रूपें धारण करतें, असे म्हणणें अधिक सशास्त्र होईल. आकाश • सूक्ष्मरूपानें अथवा स्थूलरूपानें अवतरतें. आकाशाचें हें स्थूल अथवा सूक्ष्म- रूपांतर प्राणशक्तीमुळे घडून येतें. आकाश जसे सर्वगामी आहे, त्याचप्रमाणें प्राणही सर्वगामी आहे. प्रत्येक वस्तूंत प्राण आणि आकाश यांचा वास असा- वयाचाच. आकाश हें पाण्यासारखे आहे अशी कल्पना केली तर जगांतील स्थूलवस्तू या बर्फासारख्या आहेत असें म्हणतां येईल. वर्फ हें ज्याप्रमाणें पाण्याचेंच बनलेले असते आणि तें जसे अंतर्बाह्य पाणीच असते, त्याचप्रमाणें सर्व वस्तू आकाशाच्याच बनल्या असून त्यांच्या आंतबाहेर आकाशच असतें. आकाशाला जे निरनिराळे आकार प्राप्त होतात, ते प्राणशक्तीच्या आघातामुळे झालेले असतात. शक्तीच्या स्थूलरूपाचा प्रत्यय येण्याकरितां स्थूलदेह बनला आहे. चालणे, बसणें, बोलणें इत्यादि क्रिया आणि स्नायूंच्या इतर क्रिया ह्रीं सारीं शक्तीचीं स्थूलरूपें होत. ज्याप्रमाणें स्थूलदेह आकाशांतून बनला आहे, त्याचप्रमाणें सूक्ष्मदेहही आकाशांतूनच बनला आहे. त्या सूक्ष्म- देहाच्याद्वारें प्राणाचें सूक्ष्मरूप - विचार इत्यादि-प्रत्ययास येतें. स्थूलदेह हें अगदीं बाह्यावरण असून त्याच्या आंत सूक्ष्मदेह आहे आणि त्याच्या आंत जीव आहे. जीव म्हणजे खरा मानवप्राणी. आपण आपली नखे शेकडों वेळ कापून टाकली, तरी ती आपल्या देहाचाच एक भाग म्हणवितात. ती बाहेरून आणून आपल्या देहाला चिकटविलेलीं नसतात; त्याचप्रमाणें आपल्याला सूक्ष्म आणि स्थूल असे अगदीं निरनिराळे देह असतात असे नाहीं. ज्याप्रमाणे वर्षातून शेकडों वेळां आपण आपली नखें काढून टाकतों त्याचप्र माणे आपला हा स्थूलदेह शेकडों वेळ आपण टाकीत असतों; आणि सूक्ष्म- देह अशा रीतीनें टाकतां येत नाहीं. नखें गेलीं तरी स्थूलदेह राहतो त्यांच- प्रमाणें स्थूलदेह गेला तरी सूक्ष्मदेह राहतो. जीवात्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे असें द्वैतवाद्यांचें म्हणणे आहे.
 येथवर केलेल्या विवेचनावरून, मनुष्याचें अत्यंत बाह्य आवरण स्थूलदेह हें असून तें लवकर नष्ट होतें आणि त्याच्या आंतील आवरण ह्मणजे सूक्ष्म-