पान:विवेकानंद.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

पणे होऊ लागतील. तसेच एखाद्या मनुष्याचे भाषण आपण ऐकत असलो, तर त्यावेळी पाहण्याची क्रिया बंद पडेल. सर्व गोलक निरनिराळे असून त्यांचा मध्यवर्ती नियंता कोणी नाही असे झाले, तर केवढा घोंटाळा उपस्थित होईल तो पहा.
 हें आपलें स्थूलशरीर ज्या वस्तूंचे बनले आहे, त्या वस्तू जड आहेत. त्यांच्यांत कोणत्याही प्रकारचे चैतन्य नाही. त्याचप्रमाणे आपला सूक्ष्म देहही जडवस्तूंचा बनला आहे. सांख्यमताप्रमाणे सूक्ष्मशरीर आकारानेही अत्यंत सूक्ष्म आहे. ते ज्या वस्तूंचे बनले आहे, त्या वस्तू जड ख-या; पण त्या इतक्या सूक्ष्म-विरलस्वभाव-आहेत कीं, अति उच्चप्रतीच्या सूक्ष्मदर्शक कांचेतूनही त्या दिसणार नाहींत. या सूक्ष्मदेहाचे कार्य काय आहे ? ज्याला आपण मन या संज्ञेने ओळखतों, त्याचा वास त्या शरिरांत असतो. ज्याप्रमाणे जडदेह हा जक्तीचे निवासस्थान आहे, त्याचप्रमाणे सूक्ष्मदेह हा सूक्ष्मशक्तीचे निवासस्थान आहे. ही सूक्ष्मशक्ति विचारादि क्रियांच्या द्वारे आपल्या प्रत्ययास येते. अगदी बाह्यावरण म्हणजे स्थूल-जड-देह. त्या जडदेहाबरोबर शक्तीचे जडरूप राहते. पदार्थाच्या आश्रयावांचून शक्ति राहू शकत नाहीं. पदार्थाच्या ' द्वारेंच शक्ति प्रगट होणे शक्य आहे. पदार्थाच्या आश्रयावांचून एकट्या शक्तीला स्वतंत्र रीतीनें प्रकट होणे शक्यच नाहीं. यामुळे स्थूलशक्ति स्थूलदेहाच्या द्वारें प्रकट होते, आणि नंतर आपल्या सूक्ष्मरूपांत परत जाऊन राहते. सूक्ष्मशक्ति सूक्ष्मदेहाच्या द्वारें प्रकट होते आणि त्यावेळी तिला विचारादि संज्ञा प्राप्त होते. विचारादि सूक्ष्मशक्ति व क्रियेच्याद्वारे अनुभवाला येणारी स्थूलक्रियाशक्ति यांच्या रूपांत वस्तुतः भेद नाहीं. जो भेद आहेसा वाटतो तो गुणमूलक नसून रूपमूलक आहे. शक्ति बाह्यवर्ती झाली म्हणजे तिला आपण क्रिया म्हणतो आणि तीच शक्ति अंतवर्ती झाली म्हणजे तिला विचार हे नांव आपण देतो. मूलशक्तींत भेद नसून नामरूपामुळे भेद झाल्यासारखा दिसतो. ज्याप्रमाणे निरनिराळ्या रूपांनी प्रकट होणारी शक्ति मूलतः एकरूपच आहे, त्याचप्रमाणे स्थूलशरीर आणि सूक्ष्मशरीर यांतील द्रव्येही मूलतः एकरूपच आहेत. ज्या पदार्थांचे सूक्ष्मशरीर बनले आहे ते पदार्थही जडच आहेत-मात्र त्यांचे स्वरूप सूक्ष्म आहे.
 शक्तीचे हे नानाविध प्रकार कोठून उद्भवले? वेदान्तमताप्रमाणे प्रकृति दोन पदार्थांची बनली आहे. यांपैकी एकाला आकाश असे नांव त्यांनी दिले आहे.