पान:विवेकानंद.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन--प्रकरण ७ वें.

१९९


अवलंबून आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात्म्याचें अस्तित्वही ईश्वराच्या इच्छे- वर अवलंबून आहे. श्रीकपिलांचें सांख्यदर्शन अस्तित्वांत आले त्याच्या अगो- दरच्या काळापासून, या आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या कल्पना अस्तित्वांत असल्याचें आपणांस आढळून येतें. बाह्यवस्तूंचें ज्ञान आपणांस होतें तें एका विशिष्ट पद्धतीला अनुसरून होतें, असें श्रीकपिलांनी प्रथम सांगितले. एखाद्या बाह्यवस्तूच्या दर्शनाबरोबर पहिला आघात वाह्यकरणावर - जडडोळ्यांवर- होतो. त्या करणाच्या द्वारें तो इंद्रियाकडे-गोलकाकडे-पोहोंचविला जातो. तेथून तो आघात मनाकडे रवाना होतो. मनाकडून तो बुद्धीकडे जातो आणि शेवटीं बुद्धीच्या द्वारें त्याची रवानगी आत्म्याकडे होते. निरनिराळ्या बाह्यसंज्ञांची नोंद मेंदूंतील निरनिराळ्या गोलकांवर होते, असा शोध अर्वाचीन इंद्रियविज्ञान- शास्त्रानेंही लावला आहे. या गोलकांतही उच्च आणि नीच असे भेद त्या शास्त्राने सांगितले आहेत. या दोन प्रकारच्या गोलकांचीं कांहीं कार्ये आहेत असें जे इंद्रियविज्ञानशास्त्राचें प्रतिपादन आहे, त्या कार्यावरून पाहतां त्यांचें साम्य मन आणि बुद्धि या दोन स्वरूपांशी आहे असे आपल्या लक्ष्यांत येईल; तथापि या सर्व गोलकांच्या कार्याची वासलात जेथून लागते असा एखादा मध्यवर्ती गोलक, इंद्रिय विज्ञानशास्त्रास अद्यापि सांपडलेला नाहीं; यामुळे या निरनिराळ्या गोलकांच्या क्रिया एकत्र कोठें होतात, हा प्रश्न शिल्लकच राहतो. या गोलकांच्या वास्तव्याच्या जागा मेंदूत निरनिराळ्या ठिकाणी असून, त्या सर्वांचें नियमन करणारा असा मध्यवर्तीगोलक सांपडलेला नाहीं. यावरून सांख्यदर्शनाचा शोध निदान या बाबीपुरता तरी इंद्रियविज्ञानशास्त्राच्या सीमे- पलीकडे गेला आहे असें निर्विवाद कबूल करणे भाग आहे. हे सर्व गोलक जेथें एकत्र होतात असे मध्यवर्ती ठिकाण असलेच पाहिजे. ज्या ठिकाणी या निरनिराळ्या गोलकांच्या द्वारे आलेल्या संज्ञा एकत्र परावर्तित होतात, असा कांहीं पदार्थ असला पाहिजे. तो नसेल, तर एकतानतेचा भंग अवश्य होईल. जर असा मध्यवर्ती पदार्थ नाहीं अशी कल्पना केली, तर मला तुमच्याबद्दलची अथवा त्या चित्राबद्दलची अथवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाबद्दलची समग्र कल्पना एकाच वेळीं होणें अशक्य होईल. असें मध्यवर्ती ठिकाण नाहीं असे म्हटलें, तर पाहण्याची क्रिया एका वेळी होईल, नंतर कांही वेळानें ऐकण्याची आणि नंतर कांही वेळानें स्पर्श जाणण्याची, याप्रमाणे सर्व क्रिया विस्कलित-