पान:विवेकानंद.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


मिळाले, अमक्याच्या मनांत ईश्वरी प्रेरणा झाली, अशा प्रकारच्या कल्पना अत्यंत प्राचीनकाळीही प्रचलित होत्या. अगदी आरंभीची विश्वोत्पत्तीबद्दलची कल्पना म्हटली म्हणजे, हे सारे विश्व परमेश्वराच्या इच्छेनें शून्यांतून उद्भवले' हीच होय. आरंभी विश्वाचा कांहीं मागमूसही नव्हता आणि नास्तित्वांतूनच ते उत्पन्न झाले. यानंतरचा कल्पनासमूह पाहिला, तर त्यांत या मताबद्दल संशय प्रदर्शित केला असल्याचे आढळून येते. वेदान्तमताच्या अगदी प्रारंभकाळीं अशी शंका प्रदर्शित करण्यांत आली आहे, की 'नास्तित्वांतून अस्तित्व कसे उद्भवू शकेल ?' ज्या अर्थी या विश्वाच्या अस्तित्वाचा अनुभव येतो, त्याअर्थी कसल्या प्रकारच्या तरी पूर्व अस्तित्वांतूनच हे निर्माण झाले असले पाहिजे. नास्तित्वांतून कधीच कांहीं निर्माण होऊ शकत नाही, हा सामान्य अनुभव त्या पूर्वकालीनांसही होताच. आपणांस कोणताही पदार्थ निर्माण करावयाचा असला, तरी त्याचा मालमसाला आणि त्याचा कर्ता या दोहोंसही त्या पदार्थांपूर्वी अस्तित्व अवश्य असते, ही गोष्ट त्यांच्या रोजच्या अनुभवाची होती. यामुळे 'शून्यांतून विश्व निर्माण झालें' या पूर्वकल्पनेचा त्याग प्राचीन हिंदूनी-आयनीं-केला, हे रीतसरच झाले असे म्हटले पाहिजे. यानंतर ज्यांतून हे सारे विश्व निर्माण झालें, तो पदार्थ कोणता असावा, याच्या शोधाकडे यांच्या विचाराचा ओघ स्वाभाविकपणेच वळला. धर्मशास्त्राच्या इतिहासाचे समग्र आलोडन केले, तर एकच गोष्ट मुख्यत्वेकरून आढळून येते, ती ही की, या पदार्थाच्याच शोधांत वस्तुतः सारा धर्म गुंतला आहे. हे सारे विश्व कशांतून निर्माण झाले ?' याच प्रश्नाच्या उत्तराकरितां हा सारा खटाटोप उभा राहिला आहे. ईश्वर हा विश्वाचे निमित्तकारण आहे की नाही हा प्रश्न बाजूला ठेवला, तरी ईश्वराने हें विश्व कशांतून निर्माण केले, हा अत्यंत मोठा प्रश्न शेवटीं शिल्लक उरतोच. जगांतलें सारे तत्त्वज्ञान जगुंकाय या एकाच प्रश्नाभोवती पिंगा घालीत आहे !
 या प्रश्नाला असे एक उत्तर देण्यात आले आहे, कीं, परमात्मा, जीवात्मा आणि जडवस्तू ही तिन्ही अनंत अस्तित्वे आहेत. या तीन समांतर रेषा एका शेजारी एक अशा रीतीने अनंतकालापासून चालू आहेत. यांपैकी जीवात्मा आणि जडवस्तु-निसर्ग-हीं दोन्ही अस्तित्वें परतंत्र असून ईश्वर मात्र स्वतंत्र आहे. ज्याप्रमाणे जडवस्तूंच्या प्रत्येक अणूचे. अस्तित्व ईश्वराच्या इच्छेवर