पान:विवेकानंद.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


शकेल. त्यांच्यांत अनंत प्रकारच्या कमीअधिकपणाचें परिमाण असूं शकेल. पण पूर्ण असे एकच आहे. तें पूर्ण एखाद्या विशेष प्रकारच्या भिंगांतून पाहिलें म्हणजे त्या प्रकारच्या रंगाचें दिसतें; आणि आपण त्याला 'वरें' म्हणतों. तेंच दुसऱ्या प्रकारच्या भिंगांतून पाहिले म्हणजे त्या दुसऱ्या रंगाचें दिसतें; आणि आपण त्याला ' वाईट ' असें नांव देतों. कांहीं कांहीं गोष्टींवर आपण वरें आणि वाईट असे कायमचे ठसे मारले आहेत, हा आपला भोळे- पणा - वेडेपणा-नव्हे काय ? वास्तविक पाहतां एखादी वस्तु कमी चांगली अगर अधिक चांगली इतकेंच फारतर म्हणतां येईल. या आपल्या चांगल्या- चाईटाच्या कल्पनेमुळे दुसरीं हजारों प्रकारचीं द्वैतें - द्वंद्वें- मात्र उपस्थित झाली आहेत, आणि तीं आतां मानवी हृदयांत खोल बुड्या मारून बसली आहेत. आज युगानुयुगे या कल्पना स्त्रीपुरुषांस भेडसावीत आहेत. जगांत जितका मत्सर आज दिसतो, तितक्या साऱ्याचें खापर याच कल्पनांच्या माथीं फोडलें पाहिजे. आमच्या बाल्यावस्थेपासून हीं द्वंद्वे आमच्या चित्तांत सुरुंग तयार करीत असतात, आणि यथाकाळी त्यांचा भडका उडतो. एकंदर मनुष्यजातीबद्दल आम्ही आपले म्हणून बनविलेले मत सर्वथैव चुकीचे असतें. अहाहा ! ही पृथ्वी किती सुंदर ! पण आम्हीं दिवट्यांनीं, तिला नरकाचें स्वरूप दिले आहे. मित्रहो, वरें आणि वाईट या द्वंद्वाचा त्याग आपण ज्या क्षणीं करूं त्या क्षणीं तिला स्वर्गाचें रूप प्राप्त होईल.
 'ही पृथ्वी आनंदमयी आहे. सर्व प्राण्यांना ती आनंद देते. तसेंच सर्व प्राणी पृथ्वीला आनंद देतात. ते सर्व एकमेकांचे हात धरून चालले आहेत. हा सर्व आनंद त्या आत्म्यापासून उद्भवला आहे. तोच प्रकाशक आणि अनंत आहे.' तो एकच आनंद अनंतप्रकारें व्यक्त होत आहे. मनुष्याच्या हृद- यांत प्रेमाचा जो ओलावा आहे, तो सर्व त्याचाच आहे. मग तो ओलावा साधूच्या हृदयांत असो, वा पाप्याच्या हृदयांत असो; तो एखाद्या देवाच्या हृदयांत असो, वा एखाद्या खुनी मनुष्याच्या हृदयांत असो; तो देहांत असो, मनांत असो अगर इंद्रियांत असो, तो त्याचेंच रूप. त्यावांचून अन्य काय असूं शकणार आहे ? केवळ शारीरिक सुखासारख्या अत्यंत जडरूपानेंही जें सुख प्रत्ययास येतें, तें तोच; आणि केवळ उच्च आत्मभावामुळे जें सुख अनु भवास येतें तेंही तोच. श्रीयाज्ञवल्क्यांचा हा उपदेश आहे. ज्यावेळीं सर्वत्र