पान:विवेकानंद.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ६ वें.

१९१


प्रमाणें आत्मा अनेक अधिष्ठानांत आणि सर्वत्र ओतप्रोत भरलेला असतांही त्याचें दर्शन होत नाहीं; तथापि आत्मा विश्वांत सर्वत्र आहे. सर्वच आत्म- रूप आहे. सर्व ज्ञान जेथें एकत्र सांठविले गेलें आहे असे ठिकाण आत्मा हेंच. हें सर्वं विश्व त्यांतूनच निर्माण झाले असून, त्याचा लयही त्यांतच होणार आहे. आत्मप्रतीति झाली तर आपण ज्ञानातीत होऊं.' आपण सर्व त्या आत्मरूपाचे स्फुलिंग आहों ही कल्पना येथें प्रथित केली आहे. तसेच आपण त्याला जाणले असतां आपण त्याच मूळ अधिष्ठानाला परत जाऊन त्याशी पुन्हा एकरूप होतों असेंही येथें सांगितले आहे.
 हें भाषण ऐकून मैत्रेयी घाबरली. हा प्रकार आपणांस सर्वत्र आढळून येतो. अपूर्व अर्से भाषण ऐकल्यावर पुष्कळांचे चित्त कंपित व्हावयाचेंच. मैत्रेयी म्हणाली, 'महाराज, आपण मला गोंधळांत पाडीत आहां. आपण म्हणतां सर्व देव आणि व्यक्ती नष्ट होणार ! हें ऐकून माझें चित्त ठाव सोडूं पाहत आहे ! व्यक्तित्व नष्ट झालें, तर अशा स्थितीत मला आत्मप्रतीति कशी होईल ? व्यक्तित्व नष्ट झाले म्हणजे बेशुद्धि येईल, की तशा स्थितीतही आत्मप्रतीतीची जाणीव माझ्या ठिकाणी राहील? अशा स्थितींत जाणण्या- जोगें कोणी असणार नाहीं काय ? अशा स्थितीत संज्ञा कशाची असेल ? अशा स्थितींत प्रेम कोणावर करावें ? आणि अशा स्थितींत द्वेष्य कोण असेल ? अशा स्थितीत माझें काय होईल ?' याज्ञवल्क्य म्हणाले, 'मैत्रेयि, मी बेशुद्धी- बद्दल-मोहावस्थेबद्दल बोललों नाहीं. भिऊं नको. आत्मा अविनाशी आहे. तो मूलतः अनाद्यनंत आहे. या एकरूपांत दोहोंचा भास होणें हें वैगुण्य आहे. ज्या ठिकाणी द्वैताची प्रतीति आहे, त्याठिकाणीं एक दुसऱ्याचा वास घेतो, एक . दुसऱ्याला पाहतो, एक दुसऱ्याला ऐकतो, एक दुसऱ्याबद्दल विचार करतो आणि एक दुसऱ्याला जाणतो. पण सर्वच एकात्मरूप झाल्यावर कोण कशाचा चास घेणार, कोण कोणाला ऐकणार, कोण कोणाचें स्वागत करणार आणि कोण कोणाला जाणणार ? ज्यामुळे सर्व जाणले जातें त्या मूलरूपाला जाण ण्याचें सामर्थ्य कोणाला असणार आहे ? या आत्म्याबद्दल भाषेनें सांगावया- चेंच म्हटलें, तर 'नेति नेति' इतकेंच म्हणतां येईल. तो जाणतां येण्यासा रखा नसल्यामुळे बुद्धि त्याला जाणूं शकत नाहीं. त्याच्यांत कसलाच बदल होत नसल्यामुळे तो कधींही निस्तेज होत नाहीं. तो अलिप्त असल्यामुळे