पान:विवेकानंद.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ६ वें.

१८७

प्रकरण ६ वें.
आत्मैक्य

 गेल्या प्रसंगीं ज्या विषयाची आपण चर्चा करीत होतों व त्याचा जो शेवटला निष्कर्ष आपण काढला, त्यासंबंधी हिंदुस्थानांत अत्यंत प्राचीन काळींही कशा प्रकारचे वादविवाद होत असत हे दाखविण्याकरितां, एका उप- निषदांतील कांहीं भाग मी आज आपणांस वाचून दाखविणार आहें.

बृहदारण्यकोपनिषत्-- अध्याय २. ब्राह्मण ४.


 याज्ञवल्क्य या नांवाचे एक महर्षि पूर्वकाळी होऊन गेले. वृद्धपणी गृहत्याग करावा अशी चाल पूर्वी हिंदुस्थानांत होती, हें आपणांस मीं पूर्वी सांगितलेंच आहे. एके दिवशीं याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला म्हणाले, " हे सर्व वित्त आणि इतर जी कांहीं चीजवस्त माझ्याजवळ आहे ती सर्व आतां तुझ्या स्वा करून अरण्यवास पत्करण्याचा माझा विचार झाला आहे. " ती म्हणाली, ( महाराज, संपत्तीनें विपुल अशी ही पृथ्वी मला कोणी दिली, तरी मला तीमुळे. अमरत्व प्राप्त होईल का ? ' याज्ञवल्क्य म्हणाले, 'नाहीं, तसे होणे शक्य नाहीं. फार तर तुझा संसार श्रीमंतीचा होईल, इतकेंच. संपत्तीच्या हाती अमरत्व देण्याचें सामर्थ्य नाहीं.' पत्नी म्हणाली, 'ज्यायोगे मला अमरत्व प्राप्त होईल असा कांहीं उपाय आपणास ठाऊक असल्यास मला सांगा.' याज्ञवल्क्य म्हणाले, ‘ तूं आजपर्यंत माझी आवडती होतीसच; पण या प्रश्नामुळे तूं आतां मला अधिक आवडू लागलीस. ये, इकडे येऊन वैस. आतां जें कांहीं मी तुला सांगेन, तें प्रथम लक्ष्यपूर्वक ऐकून घे आणि नंतर त्याचें सदैव चिंतन कर.' महर्षि पुढे बोलूं लागले 'स्त्री पुरुषावर प्रेम करते तें वास्तविक पुरुषा- करितां नसून ते प्रेम आत्म्यावरील आहे. ( पतिनिमित्त पती तुजला प्रिये । प्रिय असें सहसा म्हणतां नये । परम आवड आपुलि आपणा । वळख तूं तुज टाकुनिं मीपणा ॥– वामनपंडित ) तिचें खरें प्रेम आत्म्या- वर असतें आणि त्यासाठी ती पतीवर प्रेम करते. पुरुष स्त्रीवर प्रेम करतो, पण तें स्त्रीसाठीं नसून आत्म्यासाठी अंसतें. आईबाप अपत्यावर प्रेम करतात पण तें प्रेम अपत्यासाठी नसून तें आत्मप्रेमच असतें. संपत्तीची आवड वस्तुतः संपत्तीकरितां नसून, ते प्रेमही आत्मप्रेमच होय. -