पान:विवेकानंद.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


ब्राह्मणाबद्दल जें पूज्यत्व असतें तें ब्राह्मणाकरितां नसून आत्म्याकरितांच असतें. तसेंच क्षत्रियाबद्दल जो पूज्यभाव असतो, तो क्षत्रियासाठी नसून आत्म्यासाठींच असतो. त्याचप्रमाणें जगावर जें प्रेम असतें, तेंही जगाकरितां नसून आत्म्याकरितांच असतें; आणि तसेंच, देवांवर जें प्रेम असतें, तें देवां- करितां नसून आत्म्याकरितांच असतें. कोणी कशावरही प्रेम करो, तें प्रेम त्या वस्तूकरितां नसून आत्म्याकरितांच असते. याकरितां आत्मा म्हणजे काय, याजबद्दल प्रथम ऐकून घ्यावें; नंतर जें कांहीं ऐकले असेल त्याचा सांगोपांग विचार करावा, आणि मग त्याचेंच सदैव चिंतन करावें. माझ्या प्रिय मैत्रेयि, आत्मज्ञान झालें म्हणजे सर्वकांहीं ज्ञात होतें. सर्व वस्तुजातांत अज्ञात असें · कांहीं उरतच नाहीं. '
 या संभाषणाचा अर्थ काय ? आपणाला चमत्कारिक भासण्यासारखें तत्त्व- ज्ञान यांत गोविले आहे. ज्याला आपण जग या संज्ञेनें ओळखतों, त्यांतील अनेक वस्तूंच्या द्वारें आत्माच प्रतीत होत असतो, अर्से यांत सांगितलें आहे. प्रेम, प्रेम म्हणून जी कांहीं चीज आहे, तिचें वास्तविक स्वरूप म्हणजे अगदी हलक्या दर्जाचा आपलपोटेपणा हेच. याहून त्या प्रेमाला खऱ्या दृष्टीने अधिक किंमत नाहीं, आणि माझें स्वतःवरच प्रेम असल्यामुळे मी इतरांवर प्रेम· करतो, असे या संभाषणांत दर्शविले आहे, हें खरें असेल काय ? अर्वाचीन काळच्याही कांहीं तत्त्ववेत्त्यांनीं हेंच प्रतिपादन केले आहे. त्यांचेंही म्हणणें हेच आहे की, मनुष्याला कार्याकडे प्रवृत्त करणारी एकच शक्ति या जगांत आहे. ती शक्ति म्हणजे स्वार्थ. हे म्हणणे खरें आहे आणि खोटेंही आहे. या लहानशा देहांत प्रत्ययाला येणारा 'मी' हा त्या विश्वव्यापी आत्म्याची छाया- प्रतिबिंब - मात्र आहे, आणि या छायारूप 'मी' बद्दल प्रेम वाटणें हें पापमूलक आहे असे वाटतें, याचें कारण हेंच कीं, हें प्रेम समर्याद होतें. प्रेमाचें हें आकुं- चित स्वरूप आहे. आपलें प्रेम वस्तुतः छायेबद्दल नसून तें विश्वव्यापी आत्म्या- करितांच असतें; तथापि तें बाह्यतः मर्यादित झालें - आकुंचन पावलें- म्हणजे त्याला आपलपोटेपणाचें हिडिस स्वरूप प्राप्त होतें. एखादी स्त्री आपल्या नव- यावर प्रेम करते ते सुद्धां वस्तुतः विश्वव्यापक आत्म्यावरीलच प्रेम होय. आतां ही गोष्ट तिला कदाचित् समजत असेल अथवा नसेल इतकेंच. त्या प्रेमाचें रूप व्यक्त होऊन जगाच्या बंधनांत सांपडूं लागले, कीं तें हलक्या