पान:विवेकानंद.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


मनुष्य स्वतः पूर्णत्व पावला ह्मणजे इतरांतील पूर्णल त्याला दिसूं लागतें. त्याला सर्व ठिकाणी अपूर्णत्व दिसतें याचें कारण, तो स्वतःच्या अपूर्ण मनाचें प्रतिबिंब सर्वत्र पाहत असतो हेंच. तो स्वतः अपूर्ण असल्यावांचून सर्वत्र अपूर्णता त्याला कशी दिसेल ? याकरितां पूर्णत्व आणि अपूर्णत्व या दोन्ही कल्पनांचा त्याग ज्ञानी करीत असतो. त्याच्या दृष्टीनें दुसऱ्या कशाला अस्ति- त्वच नसतें. मुक्त स्थितीत त्याला बरें आणि वाईट या दोहोंपैकी कोणाचाच प्रत्यय येत नाहीं. हें बरें आणि तें वाईट असे कोण ह्मणतो ? ज्याच्या ठिकाणीं या द्वंद्वांचे अंश शिल्लक असतील तोच. शरीर कोणाला दिसतें ? जो स्वतः शरीरमय होऊन बसला असेल त्यालाच. 'मी देह नव्हें' हा अनुभव येतां- क्षणींच जगाचा लोप संपूर्णत्वानें होतो. तें कायमचेंच हरवतें. आपल्या बुद्धीला खंबीर करून जडवस्तूंत गुरफटून बसलेल्या आत्म्याला मोकळे करावयाचें हा ज्ञान्याचा मार्ग. 'नेति नेति ' हाच त्याचा मार्ग.