पान:विवेकानंद.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


अशा ठिकाणीं कधीं पाऊलही घालू नये. तुम्हांस ज्ञानयोगी होणें असेल, तर दुर्बलता प्रथम टाकली पाहिजे. त्यावांचून ज्ञानमार्गाला लागण्याची योग्यता तुमच्या अंगीं कधींही येणार नाहीं.
 अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी आपल्या चित्तावरील संशयरूपी मळ प्रथम काढून टाकला पाहिजे. प्रथम या साया उपपत्ती ऐकून घ्या. त्याबद्दल वाटेल तितक्या निकराचा बाद करा. तुमची विवेचकबुद्धि होईल तितकी प्रखर करा. तिच्या भट्टींत सर्व हिणकस जळून जाऊं द्या, आणि सत्य मार्ग असला तर हाच, अशी खात्री तुमच्या चित्ताला पक्की पटली, ह्मणजे सर्व वादविवाद बंद करून टाका. मग आपल्या तोंडाला कायमचेंच कुलूप घालणे चांगले. अशा वेळीं स्वतः वादविवाद तर करूं नयेच, पण दुसऱ्याचें भाषणही ऐकून घेऊं नये. तुमच्या स्वतःच्या चित्ताची खात्री झाल्यावर वादविवाद करून फायदा काय ? वादविवादाचें काम पूर्वोच होऊन गेल्यावर शिल्लक काय उरतें? सत्याचा अनुभव प्रत्यक्ष घेणें हेंच. मग फुकटच्या वादविवादांत आपलें मोलाचें आयुष्य व्यर्थ कां घालवावें ? सत्याचाच जप सदोदित करावयाचा, आपल्या चित्ताला दृढता आणणारा प्रत्येक विचार सांठवावयाचा आणि दुर्बलता आणणाऱ्या प्रत्येक विचाराचा त्याग करावयाचा, इतकीच कामगिरी आपल्याकरितां शिल्लक उरते. जो शुद्ध भक्तिमार्गी असतो तो मूर्तीचें आणि दुसऱ्या अशाच प्रका- रच्या वस्तूंचें चिंतन करतो. खरें झटलें ह्मणजे हाच स्वाभाविक व सोपा रस्ता आहे; तथापि तो फार लांब पछ्याचा मार्ग आहे हेंही खोटें नाहीं. राज- योगी, शरिरांतील ज्ञानकमलांचें ध्यान करून तद्द्वारा मनःशक्तीस चेतना आण ण्याचा अभ्यास करीत असतात. ज्ञानयोग्यांचा मार्ग या दोहोंहून भिन्न आहे. शरीर अथवा मन यांना अस्तित्वच नाहीं असें चिंतन करणें, हा ज्ञानयोग्याचा मार्ग. शरीर आणि मन यांच्या अस्तित्वकल्पनेचा साफ लोप झाला पाहिजे. या कल्पनांना अट्टहासानें हद्दपार करावयाचें आहे. याकरितां त्यांबद्दल अधिक विचार करून फायदा होणार नाहीं. इतर कल्पना नष्ट व्हाव्या ह्मणून मन आणि शरीर यांवर लक्ष्य लावणें ह्मणजे आगींतून निघून फुपाट्यांत जाण्या- सारखेच झाले. एक रोग बरा व्हावा ह्मणून दुसऱ्या रोगाला बोलावणे पाठवून काय फायदा ? याकरितां ज्ञानमार्ग हा अत्यंत बिकट मार्ग आहे. त्याचा मार्ग एकाच‘शब्दांत सांगावयाचा तर तो 'नेति' या शब्दानें सांगतां येईल. प्रत्येक