पान:विवेकानंद.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन- प्रकरण ५ वें.

१८३


जप. 'सोऽहम् ' हा मंत्र महाबलदायी आहे. हाच धर्म. “नायमात्मा बल- हीनेन लभ्यः " ( मुण्डकोपनिषत् ३.२.४.). हें श्रुतिवचन नित्य लक्ष्यांत बाळगणें अवश्य आहे. आत्मलाभ फक्त शूरालाच शक्य आहे. “अरे परमे- श्वरा, मी पापी आहें, मी दुःखकर्दमांत लोळणारा आहे." असले शब्द तोंडा- वाटे कधीही काहूं नका. असल्या शब्दांनी आपले तोंड कां विटाळावें? तुम्हांला मदत करावयाला या विश्वांत कोण समर्थ आहे ? सारे विश्व तुमच्या मदतीनें चालत आहे; मग या विश्वांत असा कोणता पदार्थ आहे, कीं जो तुम्हांला मदत करील. या मानवसृष्टीत, देवसृष्टीत अथवा दानवसृष्टीत असा एकही प्राणी जन्मास आला नाहीं की जो तुम्हांला मदत करील. या विश्वाचे परमे- श्वर तुम्हींच. मग तुम्हीं मदत कोणाजवळ मागावी आणि ती तुम्हांला कोणी द्यावी ? या विश्वांत मदत देणारे तुमचे तुम्हीच. एखादे वेळी आपण प्रार्थना करतो आणि ती सफळ झाली म्हणजे ती विश्वबाह्य अशा शक्तीनें ऐकली, असें आपणास वाटतें; पण तो निवळ भ्रम आहे. आपण वस्तुतः आपलीच प्रार्थना करतो आणि ती ऐकणारेही आपणच आपल्याला बाहेरून मदत मिळाली असें वाटतें; पण विश्वनिर्माणकर्ते आम्हींच असल्यावर आम्हांस मदत करण्याची पात्रता कोणत्या वस्तूच्या अंगी असणार? रेशमाचा किडा आपल्याच पोटां- तून तंतू काढतो आणि त्यांत स्वतःस गुंडाळून घेतो. त्याचे हातपाय पक्के बांधले गेले म्हणजे 'आतां यांतून मला कोण सोडवील ? ' असा विचार तो करूं लागतो. पण अशा स्थितीत त्याला मदत कोण करणार ? त्यानें निर्माण केलेले जाळें त्याचें त्यालाच तोडलें पाहिजे. तें जाळें त्यानें स्वतः तोडलें म्हणजे त्यांतून सुंदर फुलपांखरूं बाहेर पडतें आणि इच्छेस येईल तिकडे गमन करतें. हें देहरूपी जाळें तुम्हींच निर्माण केले आहे. यांतून तुम्ही बाहेर पडला म्हणजे सत्याची व तुमची भेट होईल. सदोदित आपल्या चित्ताला एकच जप शिकवीत जा. 'सोऽहम् ' हा एकच जप तुमच्या चित्तांतील अनंतवासना दग्ध करील. जी शक्ति तुमच्यांत सध्या गुप्तरूपानें वास करीत आहे ती बाहेर पडेल. सध्या निद्रावस्थेत असलेली ती स्थिति खडबडून जागी होईल. आपल्या अंतःकरणावर सत्यवस्तूचा एकसारखा आघात करून तिला जागृति आणावयाची आहे. त्यावांचून दुसरा कांहीं उपाय नाहीं. जेथें गेलें असतां दुर्बळपणाचा एखादाही विचार उद्भवत असेल