पान:विवेकानंद.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


मैश्वर, भुतेंखेतें या सर्वांना एकदम रजा द्या. 'अहं ब्रह्मास्मि' बाकीच्या साऱ्या अनंत वस्तूंना रजा द्या. “यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृ- णोति नान्यद्विजानाति स भूमाऽथ यन्नान्यत्पश्यत्यन्यच्छृणोत्यन्यद्विजानाति तदल्पं यो वै भूमा तदमृतमथ यदल्पं तन्मर्त्य स भगवः कस्मिन्प्रतिष्ठित इति स्त्रे महिनि यदि वा न महिनीति ” छांदोग्योपनिषत् ७. २४. ). जेथें एक दुसन्याला पाहतो, जेथें एक दुसऱ्याला ऐकतो, तें अल्प. ज्या ठिकाणीं एक दुसऱ्याला ऐकत नाहीं आणि एक दुसऱ्याला पाहत नाहीं, तें अनंत सर्वोत अत्युच्च ठिकाण तें हेंच. ज्या ठिकाणी प्रमाता आणि प्रमेय एकरूप होतात, ज्या ठिकाणीं मी वक्ता आणि मीच श्रोता, ज्या ठिकाणीं मी गुरु आणि मीच शिष्य आणि ज्या ठिकाणीं मी जनक आणि मीच प्रजा, तेंच एक ठिकाण मात्र निर्भय आहे. आपणाला भीति दाखविणारें दुसरें असें तेथें कोणीच नाहीं. ज्या ठिकाणीं मीच सर्वत्र असणार तेथें मला भीति दाखवा- यला तरी कोण असणार ? रोज हेंच ऐकणे, याचचा विचार करणे आणि याचाच निदिध्यास ठेवणे हाच मार्ग आहे. बाकीच्या सर्व विचारांस हांकून लावा. फक्त इतकेच शब्द ऐकण्याचा छंद तुमच्या कानांना लागूं वा. फक्त इतकेच शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचूं द्या. 'सोऽहम्' एवढ्या एकाच शब्दाचा जप आपण नित्य करावयास पाहिजे. हाच जप तुमच्या रोमरोमांत खेळत राहिला पाहिजे. तुमच्या प्रत्येक ज्ञानतंतूंच्या स्पंदांबरोबर तेथें हाच स्पंद उमटत राहिला पाहिजे. तुमच्या देहांतील रक्ताच्या प्रत्येक थेंबाबरोबर याच विचाराचें अभिसरण देहांत झाले पाहिजे. प्रत्यक्ष मृत्यूच्या मुखासंनिध असतांही त्यावेळी 'सोऽहम्' एवढेच म्हणावयाचें. हिंदुस्थानांत एक संन्यासी होता, तो फक्त 'शिवोऽहम् ' एवढा शब्द म्हणत असे. एके वेळीं तो एका अरण्यांतून जात असतां एका वाघानें त्याजवर उडी मारली. 'शिवोऽहम् ' हा त्याचा जप चालूच होता. वाघानें त्याला धरून फाडलें आणि ठार मारलें; त्यावेळी जीव जाईपर्यंत तो 'शिवोऽहम्' एवढाच शब्द म्हणत होता. एखादें महाभय प्राप्त झाले असतां, प्रत्यक्ष मृत्यूच्या मुखीं जात असतां, लढा- ईच्या भर गदाँत असतां, समुद्राच्या तळापर्यंत बुडत असतां, अत्युच्च पर्व- ताच्या शिखरावर असतां अथवा एखाद्या निबिड अरण्यांत असतांही आपल्या मनाला 'सोऽहम्' एवढाच शब्द शिकवीत जा. रात्री आणि दिवसा एकच