पान:विवेकानंद.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ५ वें.

१८१


कांहीं जाणावयाचें आहे, तें हेंच. ज्याचा अनुभव घ्यावयाचा, तें सदैव एकरूप असणारें अस्तित्वच होय. आतां हा अनुभव कसा घेतां येईल, इतकाच काय तो प्रश्न उरला. या स्वप्नांतून आपण जागे कसे होऊं याचा विचार केला पाहिजे. आज या क्षुद्र देहांत कोंडून घेऊन 'मी' म्हणजे 'देह' हा जप आपण भ्रमामुळे करीत आहों. हा महाभ्रम कसा जाईल ? या विश्वाचें अधिष्ठान • आपणच आहों. जडरूप होऊन या क्षुद्र मनुष्यदेहांत स्वतःस आपण कोंडून घेतलें आहे. स्वतःची सदैव सुखरूपता विसरल्यामुळे एखाद्याच्या तोंडून दोन शब्दांची अपेक्षा आपण करीत आहों ! एखादा रागाचा शब्द ऐकल्याबरोबर आपला आनंद पार मावळून जातो ! हर हर ! कोण भयंकर दशा ही ! गुलामगिरीचें याहून खडतर असे स्वरूप कोणतें असणार ! जो मी सुखदुःखादि सर्व प्रकारच्या द्वंद्वांपलीकडे असणारा, हें सारें विश्व ज्या माझें केवळ प्रतिबिंव, ज्या माझ्या अनंत तेजोनिधींतून चंद्रसूर्यादि गोल, तुषारां- •सारखे उडाले आहेत, तोच मी अशा गुलामगिरीत खितपत पडलों आहे, अं! माझ्या शरिराला कोणी चिमटा घेतला तर ताबडतोब दुःखाने मी ओरडतों ! • एखादा गोड शब्द कोणी उच्चारला म्हणजे जणूंकाय मी आनंदाच्या शिखरा- मी या वर बसतों ! काय ही माझी स्थिति ! मी या भिकार देहाचा गुलाम, तुच्छ मनाचा गुलाम, मी या जगाचा गुलाम, एखाद्या बऱ्यावाईट शब्दाचा गुलाम, अनंत वासनांचा मी गुलाम, सुखाचा गुलाम, जीविताचा गुलाम आणि मृत्यूचाही गुलाम ! या सर्व वस्तूंचा मी दासानुदास बनून गेलों आहे ! आतां या गुलामगिरींतून माझी सुटका कशी होईल ? या अनंत शृंखलांचीं जाळी कशीं तुटतील ? याला कांहीं उपाय आहे काय ? आहे. उपाय हाच. • सर्वव्यापी आत्म्याबद्दल ऐकर्णे, त्याचें ज्ञान करून घेणे आणि त्याचेंच सदैव चिंतन-ध्यान-करणें हाच उपाय योग्य आहे. अद्वैतवादी ज्ञानी पुरुषांनी हाच उपाय सांगितला आहे. सत्यवस्तूबद्दल प्रथम ऐकून घ्या; जे कांहीं तुम्हीं ऐकलें असेल, त्यावर नंतर विचार करा; आणि त्यानंतर त्या एकाचेंच सदैव चिंतन करा. सदोदित एकच विचार चित्तांत असूं द्या. 'अहं ब्रह्मास्मि' यावांचून दुसरें कांहींच चित्तांत असूं नये. यावांचून अन्य कोणताही विचार आपलें बंधन अधिक दृढ मात्र करील, हे जाणून त्याचा त्याग करावा. 'मी अमुक' अशा प्रकारची आकुंचित भावना चित्तांत उठू देऊं नये. हें शरीर, मन, पर-