पान:विवेकानंद.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ५ वें.

१७९


दुसऱ्या कल्पनेस सुरवात होते आणि त्या दोहोंचा अर्थाअर्थी संबंध नसतो. या सर्व गोष्टी विसंगत आहेत, असें लहानपणी आपणांस वाटत नाहीं. त्यावेळी त्या संगतवारच वाटत असतात. या पुस्तकाच्या लेखकानें आपल्या लहान- पणींच्या मनोवृत्तींची पुरती आठवण करूनच मुलांसाठी हे पुस्तक तयार केल्याचे दिसून येतें. लहानमुलांच्या दृष्टीने ज्या गोष्टी सुसंगतशा दिसतात, त्याच गोष्टी मोठेपणीं विसंगत दिसूं लागतात. आपणही वाढलेली मुलेच आहों. आपली योग्यता मुलांहून कांहीं अधिक आहे, असें नाहीं. आतां सांगितलेल्या पुस्तकासारखीच जगाची हुबेहुब स्थिति आहे. त्यांत सर्वत्र विसंगतता भरली आहे. एकच गोष्ट एकाच प्रकारें अनेक वेळां घडून आल्याचे दिसले, म्हणजे त्यावरून आपण आपले कायदे बनवितों. एखाद्या गोष्टीची परंपरा एकसारखी अनेक वेळां दिसली म्हणजे आपले कारणकार्यभाव आपण तयार करतो. त्या परंपरेपैकी एका गोष्टीला आपण कारण म्हणतो आणि दुसरीला कार्य असे नांव देतो. आपणच निर्माण केलेल्या या कार्यकारणभावांस आणि कायद्यां अनुसरून विश्व वर्तत आहे, असे आपणांस वाटतें. चालू स्वप्नाचा अंत झाला म्हणजे दुसऱ्या स्वप्नाला प्रारंभ होतो आणि त्या वेळींही जें कांहीं घडतें तें सुसंगत आहे अशी कल्पना कायम असतेच. स्वप्नांत अनेक वस्तूंचें दर्शन ·आपणांस होते आणि त्यावेळी त्या वस्तु सुसंगत आहेत असे आपणांस वाटत असतें. स्वप्न चालू असतां अनेक प्रकारच्या क्रिया घडलेल्या आपणांस दिसतात आणि त्यावेळी तरी त्यांत विसंगतपणा आहे, असे आपणांस वाटत नाहीं. आपण जागे झालों म्हणजे स्वप्नांतील अनेक क्रियांचा विसंगतपणा आपणांस दिसूं लागतो. त्याचप्रमाणे या विश्वरूप महास्वप्नांतून आपण जागे झालों व सत्यस्वरूपाशीं त्याची आपण तुलना केली, म्हणजे हजारों विसंगत गोष्टी त्यांत आपणांस दिसूं लागतील. गारुड्याच्या पोतडींत जशा अस्ताव्यस्त वस्तू भरलेल्या असतात, तसेंच है जग म्हणजे अस्ता- व्यस्त वस्तूंचे प्रचंड पोतडें आहे. असे आपणांस दिसून येईल. अनेक प्रका- रच्या विसंगत चित्रांचे एक लांबलचक भेंडोळे आपल्यासमोर उलगडत आहे असे आपणांस दिसून येईल. त्यांत आरंभ कशाचा आणि शेवट तरी कशाचा ? पण या स्वप्नालाही शेवट येईल अशी आपली खात्री असूं द्या. माया म्हणतात ती हीच. ढग इतस्ततः फिरूं लागले, म्हणजे सूर्य चालू